शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोड सिमेंटचे

By admin | Updated: January 21, 2015 00:24 IST

नागपूर शहरातून जाणाऱ्या रिंगरोडचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे.

गडकरींचे प्रयत्न : २९३ कोटी मंजूरनागपूर : नागपूर शहरातून जाणाऱ्या रिंगरोडचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २९३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे.शहरातील रिंगरोडची अवस्था वाईट झाल्याने त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. या मार्गावर अपघातही वाढले होते. त्यामळे रिंगरोडच्या दुरुस्तीची मागणी वेळोवेळी केली जात होती. रिंगरोडचे सिमेंटीकरण केले जाईल,असे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. त्याची पूर्तता यानिमित्ताने झाली आहे. रिंगरोड सिमेंटीकरणासाठी २९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून एमआयडीसी ते हिंगणा टी पॉर्इंट, हिंगणा टी पॉर्इंट ते दिघोरी, दिघोरी ते भंडारा रोड, भंडारा रोड ते कामठीरोड, कामठी रोड ते सावनेर रोड, सावनेर रोड ते काटोल रोड, काटोल रोड ते अमरावती रोड असे एकूण १७ किलोमीटर रस्त्यांचे चौपदरीकरण व सहापदरीकरण करण्यात येणार आहे. दोन वर्षाच्या आत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे अनेक दिवसांपासूनची नागपूरकर नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे.रस्ते होणार सिमेन्टचेएमआयडीसी टी पॉईन्ट - हिंगणा टी पॉईन्ट, दिघोरी - भंडारा रोड, भंडारा रोड-कामठी रोड,कामठी रोड - सावनेर रोड, सावनेर रोड - काटोल रोड आणि काटोल रोड - अमरावती रोड. या रस्त्या दरम्यान १७ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण व सहा पदरीकरण होणार आहे. यामुळे हिंगणा टी पॉईट ते प्रतापनगर चौक, प्रतापनगर चौक ते छत्रपती चौक, छत्रपती चौक ते मानेवाडा चौक आणि मानेवाडा चौक ते दिघोरी चौक हे रस्ते सिमेंटचे होणार आहे.