शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडीआर’साठी रिंगरोडचा घाट

By admin | Updated: July 11, 2017 00:25 IST

रिंगरोडचा घाट सत्ताधारी भाजपाने घातल्याने त्याविरोधात काळेवाडी, थेरगाव, चिंचवड, आकुर्डी परिसरातील नागरिक एकवटले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील कालबाह्य रिंगरोडचा घाट सत्ताधारी भाजपाने घातल्याने त्याविरोधात काळेवाडी, थेरगाव, चिंचवड, आकुर्डी परिसरातील नागरिक एकवटले आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसह, काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप व भारिप बहुजन महासंघाने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. चिंचवड परिसरात प्रशस्त रस्ते आहेत. त्यामुळे लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून नवे रस्ते करण्याची गरज नाही. रिंगरोडच्या परिसरात नेत्यांनी जमिनी खरेदी केल्या आल्या आहेत़ त्यातून टीडीआर मिळविण्याचा डाव आहे, त्यासाठी रिंगरोडचा घाट आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. आमच्याशिवाय प्रश्न सुटत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे, आम्ही जनतेबरोबर आहोत, अशी भूमिका भाजपा गटनेते एकनाथ पवार यांनी घेतली आहे. प्राधिकरणातील रिंगरोडवरून राजकीय पक्षांत जुंपली आहे. नागरिकांचे आदोलन तीव्र झाल्याने त्यास पाठिंबा देण्यासाठी भाजपा वगळता सर्वच पक्ष उतरले आहेत. यासंदर्भातील पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेवक मारुती भापकर, भारिप बहुजन महासंघाचे देवेंद्र तायडे, शेकापचे शहराध्यक्ष हरिष मोरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, संघटक विजय लोखंडे आदी उपस्थित होते.पालिका निवडणुकीपूर्वी शहरातील एकाही बांधकामांची वीट हलू देणार नाही, पूर्ण शास्ती कर माफ करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. अनधिकृत बांधकामे, प्राधिकरणातील घरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. आता या प्रश्नांचा विसर त्यांना पडला आहे. रिंगरोड बाधित स्वयंस्फूर्तीने स्वत:चे हक्काचे घर वाचविण्यास रस्त्यावर उतरले आहेत. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादीनागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भाजपाला विरोधकांवर आरोप करण्यासाठी मुद्दा सापडला नाही. तर या आंदोलनामागे विरोधकच आहेत, असे भाजपाने आळविला राग चुकीचा आहे.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेसविरोधात असताना भाजपाचे अनेक नेते आमच्याबरोबरच आंदोलन करत होते. परंतु, सत्ता येताच श्रेयवादाचे गलिच्छ राजकारण करत आहेत. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून रिंगरोड बाधितांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. - मारुती भापकर शहरातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. कायदे जनहितासाठी आहेत. रिंगरोड रद्द करता येऊ शकतो किंवा स्थलांतरित होऊही शकतो. रिंगरोडवर उद्यान केले जात आहे. संघर्ष समितीच्या लोकांना रिंगरोड होणारच, असे सत्ताधारी सांगतात. ही बाब चुकीची आहे. सत्ताधाऱ्यांकडून रिंगरोडचा अट्टाहास धरून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे. - राहुल कलाटे, शहराध्यक्ष, शिवसेना