निवासी डॉक्टरांचा संप मागे

By Admin | Updated: June 20, 2014 00:54 IST2014-06-20T00:54:10+5:302014-06-20T00:54:10+5:30

डॉक्टराला मारहाणप्रकरणी १६ जूनपासून पुकारण्यात आलेला संप आज गुरुवारी मागे घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय (डीएमईआर) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले आश्वासन,

Resident doctors retreat | निवासी डॉक्टरांचा संप मागे

निवासी डॉक्टरांचा संप मागे

डीएमईआर आणि मंत्र्यांनी दिले आश्वासन : मेडिकलमध्ये परतले डॉक्टर
नागपूर : डॉक्टराला मारहाणप्रकरणी १६ जूनपासून पुकारण्यात आलेला संप आज गुरुवारी मागे घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय (डीएमईआर) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले आश्वासन, रुग्णांचे होत असलेले हाल आणि मेडिकल प्रशासनाने वसतिगृहे रिकामे करण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटीसामुळे हा संप मागे घेण्यात आला.
मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर गेल्यामुळे गरीब रु ग्ण रडवेला आला होता. सलग तीन दिवस मेडिकलमध्ये रुग्णाचे हाल सुरू होते. जिथे सहा डॉक्टर विभाग सांभाळत होते तिथे एक किंवा दोन वरिष्ठ डॉक्टरांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांसोबतच सामान्य रुग्णांनाही याचा मोठा फटका बसला. निवासी डॉक्टर हा मेडिकलचा कणा आहे. हा कणाच नसल्याने या रुग्णालयातील ७० टक्के रुग्णसेवा प्रभावित झाली होती. मागील दोन दिवसांपासून नागपूर मार्डचे पदाधिकारी अधिष्ठाता डॉ. राजारामा पोवार यांच्याशी चर्चा करीत होते, परंतु त्यांच्या मागण्या अधिष्ठाता स्तरावरील नसल्याने त्यांनी गुरुवारी सकाळी मुंबईत डीएमईआर डॉ. प्रवीण शिनगारे व वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी भेट घेतली. यातील काही मागण्या मान्य करण्यात आल्याने सायंकाळी संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.
रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी सायंकाळी ६ वाजतापासून आपली ‘ड्युटी पोजिशन’ लक्षात घेत कामाची जबाबदारी स्वीकारली. आज दिवसभरात मेडिकलमध्ये नेहमीच्या तुलनेत ओपीडी कमी झाली होती. तातडीच्या शस्त्रक्रिया सोडल्यास इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Resident doctors retreat