शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांना सतावतेय बायोमेट्रिक उपस्थितीची चिंता; ‘ड्युटी लॉग’मध्ये अडचण; कागदोपत्री ‘अनुपस्थित’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:11 IST

 प्रत्यक्ष ड्युटी करूनही उपस्थिती नोंदली जात नसल्याने त्यांच्या पगारातून पैसे कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र सीनियर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने आधार-लिंक बायोमेट्रिक प्रणालीतील त्रुटींविषयी गंभीर चिंता व्यक्त केली. या अडचणींमुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील निवासी  डॉक्टरांना ‘ड्युटी लॉग’ करता येत नाही. परिणामी, डॉक्टर कामावर असतानाही कागदोपत्री ‘अनुपस्थित’ दाखवले जात आहेत.

 प्रत्यक्ष ड्युटी करूनही उपस्थिती नोंदली जात नसल्याने त्यांच्या पगारातून पैसे कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जीटी रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले, ही समस्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. विभागप्रमुखांनी प्रमाणित केलेली उपस्थिती विचारात घेणे यासाठी संबंधित रुग्णालय प्रशासनावर अवलंबून राहावे लागते. 

नेमक्या त्रुटी काय?
महाराष्ट्र सीनियर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष  डॉ. अभिजित हेलगे यांनी सांगितले, ही प्रणाली अनेकवेळा चेहरा ओळखण्यात किंवा आधार नोंदींशी जुळवण्यात अपयशी ठरत आहे. अनेक डॉक्टरांनी या समस्येबाबत त्यांच्या विभागप्रमुख  वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे तक्रारी केल्या आहेत. 

आम्ही ड्युटीवर होतो हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे फारसे पर्याय नाहीत. हा त्रास काही वैद्यकीय महाविद्यालयात होत आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केवळ जीटी रुग्णालयातच काही वरिष्ठ निवासी डॉक्टरांना याचा त्रास झाला आहे.
 
तसेच काही अन्य रुग्णालयांतही ही समस्या आहे. या समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून विभागप्रमुखांकडून प्रमाणपत्रे दिली जात असली तरी, रुग्णालय प्रशासन अनेकवेळा बायोमेट्रिक उपस्थितीवरच ठाम राहते. त्यामुळे त्यात तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Biometric Attendance Troubles Resident Doctors; Duty Log Issues Cause Absence

Web Summary : Maharashtra's resident doctors face biometric attendance issues, marking them 'absent' despite working. Faulty systems fail to recognize faces, impacting duty logs and potentially salaries. Doctors are seeking solutions with hospital administrations for resolution.
टॅग्स :doctorडॉक्टर