शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांचा संप चर्चेनंतर मागे

By admin | Updated: August 28, 2014 02:07 IST

मागील तीन दिवसांपासून मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचा सुरू असलेला संप प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर मिटला. बुधवारी दुपारी २.३० वाजता सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले.

पाच सुरक्षा गार्ड निलंबित : आकस्मिक विभागाची सुरक्षा वाढली नागपूर : मागील तीन दिवसांपासून मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचा सुरू असलेला संप प्रशासनाच्या आश्वासनानंतर अखेर मिटला. बुधवारी दुपारी २.३० वाजता सर्व निवासी डॉक्टर आपापल्या कामावर परतले. बुधवारी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्यासोबत निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा चर्चा झाली. या चर्चेत अधिष्ठात्यांनी मार्डच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मार्डने संप मागे घेण्यात आला. अधिष्ठात्यांनी रविवारी रात्री आकस्मिक विभागात तैनात युनिटी सिक्युरिटीच्या पाच सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. घटनेच्या दिवशी सुरक्षा गार्ड हे मूकदर्शक असल्याचा आरोप मार्डने केला होता. प्रकरण गंभीर असतानाही त्यांनी हस्तक्षेप केला नाही. त्याचप्रमाणे आकस्मिक विभागात मॅस्कोचे १२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. यात महिला सुरक्षा गार्डचाही समावेश आहे. यासोबतच आकस्मिक विभागात व्हेंटिलेटरयुक्त पाच खाटांचा रिकव्हरी कक्ष तयार करण्यात आला आहे. ईसीजी मशीन संचालित करण्यासाठी टेक्निशियन राहतील. सोनोग्राफी मशीन व एक्स-रे मशीनचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ते लवकरच मिळण्याची शक्यता आहे. गेटपास व्यवस्था सक्तीने लागू करण्याची मागणी मार्डने केली असून, अधिष्ठात्यांनी ती मागणी मान्य केली आहे. मार्डचे अध्यक्ष डॉ. आयुध मगदुम यांनी सांगितले की, लिखित आश्वासनानंतरच निवासी डॉक्टर कामावर परतले आहेत. जर आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा संप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टचे लागणार पोस्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे डॉक्टरांशी वाद घालू नयेत, यासाठी रुग्णालयात ठिकठिकाणी डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टसंबंधीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. यात डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कायद्यानुसार कुठली कारवाई केली जाऊ शकते, याच्या माहितीचा उल्लेख करण्यात येईल. समितीचा अहवाल सादर मेडिकलमधील आकस्मिक विभागात रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रुग्णांचे नातेवाईक आणि निवासी डॉक्टर्स यांच्यात मारहाण झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले. मेडिकल प्रशासनानेसुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीने बुधवारी सकाळी आपला अहवाल प्रशासनाकडे सोपविला. रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही तेवढेच दोषी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.