गणपती बाप्पा मोरया! प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर झळकला महाराष्ट्राचा गणेशोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 14:25 IST2026-01-26T13:21:34+5:302026-01-26T14:25:17+5:30

Republic Day Pared 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या संचलनामध्ये विविध राज्ये आणि मंत्रालयांच्या चित्ररथांनी देशाचा संपन्न सांस्कृतिक वारसा आणि विकसित भारताचं दर्शन घडवलं. यावेळी महाराष्ट्राच्या गणेशोत्सवावर आधारित चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर येताच गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष झाला. 

Republic Day Pared 2026: Ganpati Bappa Morya! Maharashtra's Ganeshotsav shines on the Kartavya path on Republic Day | गणपती बाप्पा मोरया! प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर झळकला महाराष्ट्राचा गणेशोत्सव

गणपती बाप्पा मोरया! प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर झळकला महाराष्ट्राचा गणेशोत्सव

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजधानी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर पार पडला. येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन केल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी आपली शस्त्रास्त्रे आणि कवायतींमधून शौर्याचं प्रर्शन केलं. तसेच विविध राज्ये आणि मंत्रालयांच्या चित्ररथांनी देशाचा संपन्न सांस्कृतिक वारसा आणि विकसित भारताचं दर्शन घडवलं. यावेळी महाराष्ट्राच्यागणेशोत्सवावर आधारित चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर येताच गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष झाला.

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या संचालनासाठी महाराष्ट्राने यावेळी राज्यातील प्रमुख उत्सव असलेल्या गणेशोत्सवाचा विषय निवडला होता. संचलनासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये डोक्यावरून नेण्यात येणारी गणेशमूर्ती, गणेशमूर्तीचं रंगकाम करणारा कलाकार, ढोलपथकात ढोल वाजवणारी महिला, अष्टविनायकांच्या प्रतिकृती, गणेश मंदिराची प्रतिकृती असा जिवंत देखावा मांडण्यात आली आहेत. तसेच या चित्ररथासोबत असलेल्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याविष्कार करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

दरम्यान, आज प्रजासत्ताक दिनावेळी झालेल्या संचालनामध्ये देशातील १७ राज्ये आणि १३ मंत्रालयांचे मिळून ३० चित्ररथ सहभागी झाले होते. तसेच तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी यावेळी थरारक प्रात्यक्षिकेही दाखवली. प्रजासत्ताक दिनाला   प्रमुख पाहुणे म्हणून युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व़ॉन डेर लेयेन उपस्थित होत्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांच्या जवानांचं अभिवादन स्वीकारले. तर संचलनामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक केले.  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुण्यांना कर्तव्य पथावरील संपूर्ण कार्यक्रमाची आणि विविध चित्ररथामधून दाखवण्यात आलेल्या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.  

Web Title : गणतंत्र दिवस पर कर्तव्य पथ पर महाराष्ट्र के गणेशोत्सव की धूम!

Web Summary : गणतंत्र दिवस परेड में महाराष्ट्र के गणेशोत्सव की झांकी ने सबका मन मोह लिया, जिसमें राज्य की जीवंत संस्कृति का प्रदर्शन किया गया। झांकी में गणेश मूर्तियाँ, कलाकार, ढोल वादक और मंदिर की प्रतिकृतियाँ थीं, जो महाराष्ट्र की समृद्ध परंपराओं को दर्शाती हैं। परेड में सत्रह राज्यों और तेरह मंत्रालयों ने भाग लिया।

Web Title : Maharashtra's Ganeshotsav dazzled on Kartavya Path for Republic Day!

Web Summary : Maharashtra's Ganeshotsav tableau captivated Republic Day parade, showcasing state's vibrant culture. The tableau featured Ganesh idols, artists, drummers, and temple replicas, highlighting Maharashtra's rich traditions. Seventeen states and thirteen ministries participated in the parade.