LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!

Rishabh Pant Fined News: आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने कारवाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:07 IST2026-05-16T11:05:31+5:302026-05-16T11:07:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: LSG Captain Rishabh Pant Fined INR 12 Lakh for Slow Over-Rate Against CSK | LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!

LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!

आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने कारवाई केली. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघाने संथ गतीने गोलंदाजी केल्यामुळे ऋषभ पंतला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे दंड सोसावा लागणारा ऋषभ पंत हा आठवा कर्णधार ठरला आहे.

आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, लखनऊ सुपर जायंट्सचा संघ निर्धारित वेळेत आपल्या २० ओव्हर्स पूर्ण करू शकला नाही. हा संघाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत केलेला चालू हंगामातील पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार केवळ कर्णधार ऋषभ पंतवर १२ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.  टी-२० क्रिकेटमध्ये ठरलेल्या वेळेत ओव्हर्स पूर्ण करणे बंधनकारक असते, जेणेकरून सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि वेळेचे नियोजन कोलमडणार नाही.

अशी चूक झाल्यास...

लखनऊच्या संघाने या सामन्यात चेन्नईवर शानदार विजय मिळवला असला, तरी या दंडात्मक कारवाईमुळे पंत आणि लखनऊ व्यवस्थापनाला आगामी सामन्यांमध्ये आपल्या रणनीतीसोबतच वेळेचेही गणित अचूक ठेवावे लागणार आहे. कारण पुन्हा अशी चूक झाल्यास दंडाची रक्कम वाढू शकते किंवा कर्णधारावर बंदीची कारवाई देखील होऊ शकते.

लखनौचा चेन्नईवर दणदणीत विजय

लखनौ आणि चेन्नई यांच्यात आयपीएल २०२६ मधील ५९ वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने १८८ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाने अवघ्या १६.४ षटकातच सात विकेट्सने विजय मिळवला. लखनौच्या विजयात सलामीवीर मिचेल मार्शने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या ३८ चेंडूत ९० धावा करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Web Title : धीमी ओवर गति के लिए बीसीसीआई ने एलएसजी कप्तान ऋषभ पंत पर जुर्माना लगाया।

Web Summary : सीएसके के खिलाफ धीमी ओवर गति के लिए बीसीसीआई ने एलएसजी के कप्तान ऋषभ पंत पर ₹12 लाख का जुर्माना लगाया। एलएसजी ने मैच जीता, लेकिन पंत इस आईपीएल सीजन में जुर्माना भरने वाले आठवें कप्तान बन गए। दोबारा अपराध करने पर कड़ी सजा हो सकती है।

Web Title : BCCI penalizes LSG captain Rishabh Pant for slow over rate.

Web Summary : Rishabh Pant, LSG captain, fined ₹12 lakhs by BCCI for slow over rate against CSK. LSG won the match, but Pant becomes the eighth captain penalized this IPL season. A repeat offense could lead to harsher penalties.