शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:43 IST

१७ जुलै २०२५ रोजी विधान भवनाच्या इमारतीत नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांनी मुंबई विधानभवनातील मुख्य इमारतीत एकमेकांना धक्काबुक्की केली होती.

नागपूर - मागील अधिवेशनात मुंबईत विधान भवनाच्या इमारतीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होता. आज नागपूर अधिवेशनात हा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. 

शिवसेनेचे आमदार विशेषाधिकार समितीचे प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांनी याबाबत सभागृहात अहवाल सादर केला. ते म्हणाले की, १७ जुलै २०२५ रोजी विधानसभेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांनी आपापसात धक्काबुक्की करत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानभवनाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन केल्याने विशेषाधिकारी भंग आणि अवमान समितीचा अहवाल सादर करत आहे असं सांगितले. 

समितीने काय केली शिफारस?

१७ जुलै २०२५ रोजी विधान भवनाच्या इमारतीत नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांनी मुंबई विधानभवनातील मुख्य इमारतीत एकमेकांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी अध्यक्षांनी या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. समितीने या प्रकरणात एकूण १० बैठका घेतल्या. आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक सर्जेराव टकले यांचे साक्ष पुरावे नोंदवले. सर्व बाबींचा विचार करून समितीने शिफारसी केल्या आहेत.

विधान भवनासारख्या प्रतिबंधित क्षेत्रात गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेल्या व्यक्तींना विनापडताळणी प्रवेश न देणे 

  • विधान भवनात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी अशा नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • विधान भवनात यापुढे अशी घटना घडू नये सुरक्षा विभाग, पोलिस समन्वय ठेवून चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
  • विधानभवनात येणाऱ्या अभ्यंगतांची स्वयंचलित रिअलटाईम पार्श्वभूमी तपासण्यात येईल अशी यंत्रणा उभी करावी.
  • अभ्यगंतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात आल्यास त्याची प्रवेशिका तातडीने रद्द होईल असा डेटाबेस प्रवेश वितरण प्रणाली तज्ज्ञांकडून निर्माण करण्यात यावी

देशमुख-टकले यांना काय शिक्षा?

दरम्यान, विधान भवनातील या घटनेबाबत दंडात्मक कारवाई म्हणून नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना २ दिवसांची कारावासाची शिक्षा देण्यात यावी. त्याशिवाय या दोघांनाही मुंबई, नागपूर विधान भवन परिसरात येण्यास हा विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे २०२९ पर्यंत बंदी घालण्यात यावी अशी समितीने शिफारस केली आहे. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Report on Padalkar-Awhad clash: Jail for workers, entry ban.

Web Summary : Report on Padalkar-Awhad supporters' clash in Vidhan Bhavan submitted. Recommends two-day jail for Nitin Deshmukh, Sarjerao Takle and bans entry till 2029. Security improvements advised.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनvidhan sabhaविधानसभाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड