Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:01 IST2026-04-19T13:59:55+5:302026-04-19T14:01:23+5:30
Free Ration: दर महिन्याची फरफट वाचणार; अंत्योदय, प्राधान्य गटांतील नागरिकांना दिलासा

Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचे धान्य देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य एकाच वेळी एप्रिलमध्ये वितरित केले जाणार आहे.
सरकारच्या नव्या निर्णयानुसार अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच पुढील तीन महिन्यांचे (एप्रिल, मे, जून) धान्य एकत्र दिले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दर महिन्याला रेशन दुकानात जाण्याची गरज राहणार नाही.
कोणते धान्य किती किलो मिळणार?
प्राधान्य लाभार्थी गट : प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ, ३ किलो गहू
अंत्योदय लाभार्थी गट : कुटुंबाला ३५ किलो धान्य
लाभार्थ्यांसाठी निर्णय
धान्यवाटपासाठी दुकानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ पासून ८ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे लाभार्थ्यांची उन्हातान्हात वणवण थांबेल, असे रेशन अभ्यासक शैलेश सोनावणे यांनी सांगितले.
ठशाशिवाय रेशन नाही?
रेशन वितरणासाठी ई-पीओएस मशीनद्वारे अंगठ्याचा ठसा (बायोमेट्रिक प्रमाणीकरण) आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे. काही ठिकाणी पर्यायी ओटीपी प्रणालीही लागू असू शकते.