ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:27 IST2026-04-21T17:26:32+5:302026-04-21T17:27:23+5:30
Onion and Garlic Ban: भारतात असंही एक शहर आहे जिथे जेवणात कांदा आणि लसुणीचा वापर करण्यास पूर्ण मनाई आहे. येथील शेतात कांदा लसूण पिकत नाही. एवढंच नाही तर येथील बाजारातही कांदा आणि लसूण विकण्यासाठी येत नाही. तसेच स्वयंपाकामध्येही कांदा, लसुणीचा वापर केला जात नाही.

ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
विविधतेने नटलेल्या भारतात खानपानाच्या विविध पद्धती आहेत. त्यात कांदा आणि लसूण ही भारतातील स्वयंपाकातील अविभाज्य भाग आहे. मात्र भारतात असंही एक शहर आहे जिथे जेवणात कांदा आणि लसुणीचा वापर करण्यास पूर्ण मनाई आहे. येथील शेतात कांदा लसूण पिकत नाही. एवढंच नाही तर येथील बाजारातही कांदा आणि लसूण विकण्यासाठी येत नाही. तसेच स्वयंपाकामध्येही कांदा, लसुणीचा वापर केला जात नाही. श्रध्दा, नियम आणि परंपरेचा असा अनोखा संगम क्वचितच कुठेही पाहायला मिळतो.
कांदा आणि लसुणीच्या वापरावर बंदी असलेल्या या शहराचं नाव आहे कटरा. जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या वैष्णो देवी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या कटरा या शहराची ओळख ही पूर्णपणे भक्ती आणि सात्विक जीवनशैलीशी संबंधित आहे. येथे तुम्हाला बाजारात कांदा, लसूण विकली जात असल्याचं दिसणार नाही. तसेच कुठल्याही हॉटेल किंवा ढाब्यावरही कांदा आणि लसुणीचा वापर करून तयार केलेले खाद्यपदार्थही सापडणार नाहीत. ही आगळीवेगळी परंपरा कटराला देशातील इतर शहरांपासून वेगळं बनवते.
कटरा शहरामध्ये कांदा आणि लसुणीचा वापर न करण्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत. हिंदू धर्म आणि आयुर्वेदामध्ये कांदा आणि लसुणीपासून बनवलेल्या जेवणाला तामसिक भोजन मानलं जातं. तसेच त्याचा मन आणि शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कटरा येथून भाविक वैष्णौ देवी यात्रेची सुरुवात करतात. त्यामुळे वातावरण पूर्णपणे शुद्ध आणि सात्विक राखणं आवश्यक असल्याचं मानलं जातं. त्यामुळे आजही अनेक शतकांनंतर ही परंपरा कायम आहे.
आता अनेकांना कांदा आणि लसुणीच्या वापराविना बनवलं जाणारं जेवणं बेचव असेल असं वाटू शकतं. पण इथले आचारी आलं, हिंग आणि विशिष्ट्य मसाल्यांचा वापर करून स्वादिष्ट भोजन बनवतात. येथे कांदा आणि लसुणीवरील बंदीचा कुठलाही कायदा नाही आहे. मात्र केवळ श्रद्धेच्या जोरावर ही परंपरा पाळली जात आहे.