शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडे ना बॉलर, ना बॅट्समन, ते सगळेच राखीव खेळाडू; CM एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 14:15 IST

परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

सावनेर - Eknath Shinde on INDIA Allaince ( Marathi News ) विरोधी पक्षांची आघाडी मोदी व्देषाने पीडित आहे. मोदींना हरवायचे असा त्यांनी पण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकड़े ना बॉलर आहेत ना बॅट्समन जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली. 

सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मागील १० वर्ष आपण मोदींची बॅटींग पाहिली. त्यांनी देशाचा विकास केला. आता पुढची पाच वर्ष पंतप्रधान मोदी चौकार, षटकार मारुन विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही,मोदींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकेड झेंडा नाही आणि अजेंडा नाही. विरोधक कमिशन, करप्शन फर्स्टसाठी काम करतात.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झालाय. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. 

तसेच परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे. विरोधकांकडे अहंकार आहे. मोदींकडे आत्मविश्वास आहे. अहकांर विनाशाकडे नेतो तर आत्मविश्वास विजयाकडे नेतो. देशात राममंदिर उभे राहिले. सरकारने हिंमत दाखवून ३७० कलम हटवले. देशातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. रामटेक पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६ साली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि तेव्हापासून रामटेकवर भगवा फडकत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. काहीजण राम राम करतात मात्र त्यांची अवस्था म्हणजे मुहं मे राम बगल में छुरी अशी आहे. शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असंही यावेळी एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली. 

निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा

रामटेकमध्ये प्रभू रामचंद्रांनी चार महिने वास्तव्य केले होते. या काळात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा प्रभूंनी नाश केला होता. आताही तशीच वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले. 
 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ramtek-pcरामटेकNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४