शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रुखवताला मिळाला रेडिमेडचा साज

By admin | Updated: May 26, 2014 03:01 IST

रुखवत म्हणजे नववधूच्या संस्कृतीचे प्रतीक. विविध साहित्याचा वापर अतिशय कलाकुशलतेने बनविलेल्या वस्तू म्हणजे रुखवत.

शैलेश कर्पे, सिन्नर (नाशिक) - रुखवत म्हणजे नववधूच्या संस्कृतीचे प्रतीक. विविध साहित्याचा वापर अतिशय कलाकुशलतेने बनविलेल्या वस्तू म्हणजे रुखवत. नव्हे नववधूच्या मनातील भावभावना म्हणजेच रुखवत. रुखवताला भलेही विवाह सोेहळ्याच्या मंडपात एका कोपर्‍यात जागा मिळत असेल; परंतु नववधूच्या मनातील एक कोपरा म्हणजे रुखवत. विवाहसोहळ्यात मांडलेले रुखवत म्हणजे एक आपुलकी व कौतुकाचा विषय असतो. मुलीच्या हातातील कलाकुसर, तिच्या संसाराचं छोटसं रूप या रुखवतामधून पाहिले जाते. लग्नात पारंपरिक रुखवत ठेवण्याची पद्धत आजही जोपासली जात असली तरी अलीकडे तयार रुखवतालाही मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे दिसून येत आहे. विवाह सोहळ्यात आजही रुखवताला महत्त्व दिले जाते. पूर्वी रुखवत बनविण्यासाठी लग्नघरी नियोजित वधू व तिच्या मैत्रिणींची एकच धावपळ असायची. पण हल्लीच्या जमान्यात तयार रुखवत मांडले जात असल्याने त्याचे स्वरूप बदलत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. हल्ली मुलींना शिक्षण व नोकरीसाठी घराबाहेर पडावे लागते. त्यातच आई-वडील नोकरी करीत असल्याने रोजच काम उरकायची घाई. त्यामुळे विवाह जमला तरी बाजारात मिळणार्‍या तयार वस्तू रुखवत म्हणून आणल्या जातात. बाजारात विविध नावीन्यपूर्ण वस्तूंनी रुखवतांची दुकाने सजली आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी लगबग दिसून येते. आजही लग्नाच्या कोपर्‍यात असलेल्या रुखवताकडे अगदी उत्सुकतेने पाहिले जाते. पारंपरिक रुखवत हा नेहमीच कौतुकाचा आणि लक्ष वेधून घेणारा विषय असला तरी सध्याचा जमाना तयार रुखवताचा आहे. त्यामध्ये भांड्याबरोबर विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू, कलाकुसरीच्या व शोभेच्या वस्तूदेखील दिसून येतात. विवाह सोहळ्यात तयार रुखवत आणण्यासाठी शहरात दिसणारे चित्र आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहे.