शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:30 IST

Raju Shetti News: खरेतर यांना लोकशाहीचे आणि संविधानाचे नाव घ्यायचा अधिकार नाही, अशी करण्यात आली आहे.

Raju Shetti News: उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांना विधानसभेचे तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मविआची मागणी आहे. जाधव यांच्यासाठी उद्धवसेनेने तर पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना पत्रदेखील दिले आहे. महायुती सरकारला वर्ष झाले, तरी विधानसभा, विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची निवड निश्चित करण्यात आलेली नाही. यावरून विरोध पक्षाने सरकारवर टीका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर उद्धवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी सहकार्याची ऑफर भाजपाने दिल्याची खात्रीलायक माहिती असून या गुगलीद्वारे महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचे म्हटले जात आहे. यावरून आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. 

देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली

इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. लोकशाहीचे धिंडवडे काढायचे काम सरकारने ठरवले आहे. तुम्हाला जर पाशवी बहुमत आहे जर संविधानिकरित्या जे विरोधी पक्षनेता पद ते विरोधी पक्षनेते पद सरकार का देत नाही हा माझा सवाल आहे. एवढे सरकार कुणाला घाबरत आहे? घाबराये कारणच काय? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. 

दरम्यान,  सभागृहाची विरोधी पक्षनेता शान आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता असला पाहिजे. म्हणून विरोधी पक्षनेते पद दिलेले होते. आताच अशी काय अडचण आली की, सरकार विरोधी पक्षनेता होऊ देत नाही. मागच्या पाच वर्षांत मोदी सरकार संसदेत विरोधी पक्षनेता होऊ देत नव्हते. जे देशात कधी झाले नव्हते, ती पंरपरा मोदींनी देशात सुरू केली राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही पंरपरा सुरू केली. हे लोक संविधानाची भाषा करतात, लोकशाहीची भाषा करतात, ही आश्चर्याची गोष्ट आहे. खरेतर यांना लोकशाहीचे नाव घ्यायचा अधिकार नाही, संविधानाच नाव घ्यायचा अधिकार नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi and CM Fadnavis started a new tradition: Raju Shetti

Web Summary : Raju Shetti criticizes PM Modi and CM Fadnavis for not appointing opposition leaders in both houses, calling it a mockery of democracy and a deviation from constitutional norms. He questions the government's fear and commitment to democratic principles.
टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPoliticsराजकारण