शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसीच्या पत्रामुळे संभ्रम वाढला; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 20:45 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत, याबाबत गेल्या काही महिन्यासांपासून चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे.

ठळक मुद्देपरीक्षा संदर्भात देशातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना सुधारित मार्गदर्शक सूचना

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात देशातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने सुद्धा येत्या सप्टेंबर महिन्यापासून विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी मुभा दिले आहेत.मात्र, राज्य शासनाने यापूर्वीच अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार विद्यापीठांनी निकालाची तयारीही सुरू केली आहे.मात्र युजीसीच्या पत्रामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही; याबाबत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार लटकली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत, याबाबत गेल्या काही महिन्यासांपासून चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. परंतु,राज्य शासनाने जाहीर केलेल्या अध्यादेशामुळे त्यावर काहीच्या पडदा पडला होता. केवळ बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचा निर्णय घेणे बाकी होते.राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व विद्यापीठांनी परीक्षांचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबतचे सूत्रही प्रसिद्ध केले होते. त्यात आता विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केले आहेत. मात्र,विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर पेच निर्माण होऊ शकतो, असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. 

----------------

 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवले होते. त्या पत्रावर यूजीसीने तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. दरम्यानच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडून गेल्या.त्यामुळे आता संभ्रम अधिक वाढणार आहे. - डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

 -----------------------------------------

 परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य शासनाला असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे पालन न केल्यास पेच निर्माण होऊ शकतो. -प्रा. नंदकुमार निकम ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारcollegeमहाविद्यालयUday Samantउदय सामंतuniversityविद्यापीठ