शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची संततधार; पेरण्यांना सुरुवात

By admin | Updated: July 4, 2016 01:31 IST

तालुक्यात मागील २० ते २५ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने २ दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली

भोर : तालुक्यात मागील २० ते २५ दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने २ दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. पश्चिम भागातील भाताच्या रखडलेल्या लावण्या पुढील आठवड्यात सुरू होतील, तर पूर्व भागातील खरीप पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या असून बळीराजा सुखावला आहे.पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर व भाटघर धरण परिसरातील गावांत इतर ठिकाणी धूळवाफेवर सुमारे ६५० हेक्टरवर भाताची पेरणी झाली होती. मात्र, वळवाचा पाऊस न पडल्याने रोपांची उगवण उशिराने झाली. पाऊस नसल्याने भाताच्या व नाचणीच्या लावण्या रखडल्या होत्या. वीसगाव व आंबवडे खोऱ्यातही मागील आठवड्यात भातासह इतर पिकांची पेरणी करण्यात आली. पूर्व भागातील महामार्गावरील गावे आणि भोंगवली परिसरात पाऊसच नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या. पाऊस पडला तरच पेरण्या होतील; अन्यथा शेतकऱ्यांनी शेतात केलेली मशागत वाया जाणार, अशी परिस्थिती होती. मात्र, दोन दिवस झालेल्या पावसामुळे भाताच्या पिकांना जीवदान मिळाले असून, बाजरी, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांच्या पेरण्यांना जोर आला आहे. शेतकरी कामात व्यस्त झाला आहे. (वार्ताहर)>धरणक्षेत्रात १४५ मी.मि. पावसाची नोंदभाटघर धरणभागात आज ४३ तर एकूण १४५ मिमी पाऊस झाला. धरण १० टक्के भरले आहे. मागील वर्षी या वेळी भाटघर धरणभागात २९१ मिमी पाऊस होऊन धरण ३० टक्के भरले होते. तर नीरा देवघर धरणभागात आज १०७ मिमी तर एकूण २६९ मिमी पाऊस होऊन धरण ६.४० टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तीनपट पाऊस कमी असून धरणातही पाणीसाठा तिप्पट कमी आहे. मात्र, दमदार पावसामुळे भातासह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता होती. पाऊस झाल्याने भातासह इतर पिकांना फायदा होणार आहे.पाऊस पडला नसता तर भातासह सर्व पिकांवर परिणाम झाला असता. मात्र मागील दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील भाताच्या पिकांना फायदा होणार असून, पुढील आठवड्यात पश्चिम भागात भाताच्या लावण्या सुरू होतील, तर पूर्व भागातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी पावसाचा चांगला उपयोग होणार आहे.- सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी