शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपान केलेल्या पांचोलीचा जुहूच्या पबमध्ये राडा

By admin | Updated: March 9, 2015 02:17 IST

वादग्रस्त अभिनेता आदित्य पांचोली याने शनिवारी मध्यरात्री जुहूतल्या एका पबमध्ये राडा केला. पबमध्ये हिंदी गाणी वाजवा,

मुुंबई : वादग्रस्त अभिनेता आदित्य पांचोली याने शनिवारी मध्यरात्री जुहूतल्या एका पबमध्ये राडा केला. पबमध्ये हिंदी गाणी वाजवा, अशी मागणी करत त्याने डीजेला शिव्या हासडल्या. त्याला आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाऊन्सरच्या डोक्यात मोबाईल घालून त्याला जखमी केले. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास आदित्यला त्याच्या राहत्या घरून अटक केली. सुटीकालिन न्यायालयाने त्याला जामीनावर सोडले.शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सी प्रीन्सेस हॉटेलमधील ट्रायोलॉजी पबमध्ये आदित्य दोन मित्रांसोबत आला. पबमध्ये पाऊल ठेवले तेव्हाच तो नशेत होता. याच नशेत तो पबमधील डीजेकडे गेला. इंग्लिश गाण्यांऐवजी हिंदी गाणी वाजव, अशी मागणी आदित्यने केली. डीजेने ही मागणी नाकारताच त्याने डीजेशी हुज्जत घातली आणि शिवीगाळ केली. रागाच्या भरात आदित्यने पबमध्ये तोडफोडही करण्याचा प्रयत्न केला. वातावरण शांत व्हावे म्हणून पबचे बाऊन्सर मंदार पाटोळे थझ (२९) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पांचोलीला आवरण्याचा प्रयत्न केला. आदित्यने त्यांनाही शिवीगाळ सुरू केली. पाटोळे आदित्यला पबबाहेर घेऊन जाऊ लागले. तेव्हा आदित्यने आपल्या हातातला मोबाईल पाटोळेंच्या डोक्यात मारला.या हल्ल्यात पाटोळे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला खोक पडली. पाच टाके पडलेल्या पाटोळे यांना पहाटे चारच्या सुमारास रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या घटनेनंतर आदित्य आणि त्याचे मित्र मात्र पबबाहेरून पसार झाले. आदित्यला पहाटे त्याच्या राहत्या घरातून अटक केली.