शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान ग्रामसडक योजना, राज्यातील गावांना जोडणार २८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:07 IST

Maharashtra News : महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी एकूण २८,०८३ किलोमीटर मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पंतप्रधान ग्राममसडक योजनेंतर्गत ६ हजार ०५५ रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी २८ हजार किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे तसेच ९१० पेक्षा अधिक पूलांचे जाळे उभारले जाणारआहे. पंतप्रधान मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या योजनांपैकी एक पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे २७ हजार किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे. नक्षलप्रभावित गडचिरोली, पूणे, अहमदनगर आणि नाशिक येथे उभारल्या जात असलेल्या सर्वाधिक लांबीच्या रस्त्यांचा यात समावेश आहे.महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी एकूण २८,०८३ किलोमीटर मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पंतप्रधान ग्राममसडक योजनेंतर्गत ६ हजार ०५५ रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. रस्तेबांधणीसाठी सुमारे ८.६७ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण विकासमंत्रालयाच्या आकडेवारीरीनुसार यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १७९५ किलोमीटरचे ३२० रस्ते आणि १२८ पूल,१५७३ किलोमीटर लांबीच पूल आणि २७८ रस्ते आणि १६ पूल, १४०८ किलोमीटरचे २२५ रस्तेआणि १९ पूल, १३६० किलोमीटर लांबीचे २३२ रस्ते आणि ३० पूल उभारले जाणारआहेतमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सांगितले की, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील कोअर नेटवर्कमधील रस्ते नाहीत, अशा गावात वर्षभर वापरता येतील असे रस्ते बांधण्याची योजना आहे. रस्त्याच्या उभारणीत नक्षलवादी कारवाया, वनविभागाची मंजुरी, ठेकेदारी प्रक्रिया, ठेकेदारांकडून मिळणारा अल्प प्रतिसास याारख्या अनेक अडचणींचा सामना सरकारला करावा लागत आहे. विशेषकरून ग़डचिरोली, नंदुरबारसारख्या जिल्ह्यात समस्या भेडसावत आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रroad transportरस्ते वाहतूक