शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी नागपूर मुक्कामी

By admin | Updated: October 10, 2014 01:02 IST

भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी रात्री १०.३० वा. मुंबईहून नागपूरमध्ये आगमन झाले. त्यांचा राजभवनात मुक्काम असल्याने परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ब्रह्मपुरीला जाणार : सुरक्षेचा घेरानागपूर : भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी रात्री १०.३० वा. मुंबईहून नागपूरमध्ये आगमन झाले. त्यांचा राजभवनात मुक्काम असल्याने परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी रात्री ते विमानतळाहून थेट राजभवनावर गेले. सेमिनरी हिल्सच्या राजभवनावरील प्रवेशद्वारावर त्यांचा ताफा १०.४५ वाजता दाखल झाला. त्यावेळी चारही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवण्यात आली. १० आॅक्टोबरला ब्रह्मपुरी येथे सकाळी १०.३० वाजता त्यांची जाहीर सभा आहे. त्यासाठी ते नागपूर येथून सकाळी ९.१० मिनिटाने रवाना होणार आहेत. त्यापूर्वी त्यांची भाजपचे स्थानिक नेते भेट घेण्याची शक्यता आहे. तीन दिवसातील मोदी यांची ही दुसरी नागपूर भेट आहे. ७ तारखेला त्यांची येथे प्रचार सभा झाली होती. यावेळी मोदींनी विश्रांतीसाठी नागपूरची निवड केली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी नागपुरात पहिल्यांदाच मुक्कामी असल्याने त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शहर पोलिसांनी राजभवन आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. सशस्त्र सुरक्षा रक्षकांसह साध्या वेशातील पोलीस मोठ्या संख्येत गेल्या २४ तासांपासून परिसरात तैनात आहेत. एसपीजी आणि एसपीयूचेही पथक राजभवनाच्या आतमध्ये बंदोबस्तावर नजर ठेवून आहेत. (प्रतिनिधी)