शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मसत्तेचा आधार असल्यास सत्ता भ्रष्ट होत नाही

By admin | Updated: November 2, 2015 03:01 IST

‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले

मुंबई : ‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले ‘गुणरत्न संवत्सर तप’ श्री हंसरत्न विजयजी महाराज यांनी पूर्ण केले. त्या निमित्त रविवारी आयोजित केलेल्या पारणा महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते.वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर झालेल्या या महोत्सवासाठी हजारो जैन अनुयायी एकवटले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राजसत्ता ही धर्मसत्तेपेक्षा श्रेष्ठ नाही. राज्याच्या कारभारात नैतिकता राहण्यासाठी धर्मसत्ता असावी लागते, तरच राज्यकारभार पारदर्शी राहतो. भारतीय संस्कृती ही नैतिकतेवरच आधारलेली आहे.’‘श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या तपस्येमुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा समाजाला फायदा होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.नाशिकच्या संघवी कुटुंबाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवंगत कांताबेन रसिकलाल संघवी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र संघवी आणि विलास संघवी या बंधुंनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. यावेळी संघवी कुटुंबातील काश्मीराबेन, शिल्पाबेन, विराज, करण आणि स्तुती यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. त्यात न्यायमूर्ती, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक उद्योगपतींचा समावेश होता. राज्याच्या विकासातजैन समाजाचा वाटाराज्याच्या विकासात जैन समाजाची मोठी भूमिका असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ‘रोजगार निर्मितीमध्ये जैन समाजाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. व्यापार, उद्योग आणि रोजगारात या समाजाने मोलाचे योगदान दिले आहे. अन्य समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकता या समाजाकडे आहे. शिवाय शांती आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या या समाजाने नेहमीच जीवनाचे अंतिम सत्य दाखवले आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.