शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात वाघांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:11 IST

मध्यप्रदेशात सर्वाधिक वाघ; महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

- अनिल कडूपरतवाडा (अमरावती) : महाराष्ट्राासह मध्यप्रदेशात २०१४ च्या तुलनेत सन २०१८ मध्ये वाघांची संख्या वाढली आहे. २०१८ च्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशात सर्वाधिक ५२६ वाघ आहेत. सन २०१४ मध्ये मध्यप्रदेशात ३०८ वाघ होते. तेव्हा मध्यप्रदेश देशपातळीवर तिसऱ्या स्थानावर होते. आता महाराष्ट्रात ३१२ वाघ असून मध्यप्रदेश देशात अव्वल स्थानी आहे.महाराष्ट्रात २०१४ मध्ये १९० वाघ होते. त्यावेळी राज्य देशपातळीवर पाचव्या क्रमांकावर होते. २०१८ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या ३१२ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आला आहे. अवघ्या चार वर्षांत महाराष्ट्रातील वाघांची संख्या १२२ ने वाढली आहे. राज्यस्तरावरील २०१८ मधील व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर झाली असली, तरी प्रत्येक व्याघ्र प्रकल्पानुसार असलेल्या वाघांची आकडेवारी पुढील एक महिन्यात घोषित होणे अपेक्षित आहे.२००६ मध्ये राज्यात १०३ वाघ होते. २०१० मध्ये वाघांची संख्या १६९ झाली. २०१४ मध्ये राज्यात १९२ वाघांची नोंद झाली. आता २०१८ मध्ये महाराष्ट्रात ३१२ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. २०१४ मध्ये राज्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १०० ते ११० वाघ, तर मेळघाटात ४५ ते ५० वाघ नोंदले गेले होते. तर पेंचमध्ये २५ ते ३० वाघ वास्तव्यास होते.२०१८ मध्ये राज्यात वाघांची संख्या वाढल्यामुळे या व्याघ्र प्रकल्पांमध्येही वाघांची संख्या वाढली आहे. एकट्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. मेळघाटात वाघांची संख्या ५० वर स्थिरावली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता बघता ज्या अन्य व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांची संख्या अधिक आहे, तेथून काही वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात स्थलांतरित करण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. 

२०१४ मध्ये राज्यात १९० वाघ होते. २०१८ मध्ये राज्यात ३१२ वाघांची नोंद झाली. चार वर्षांतील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.- एम. एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प 

टॅग्स :TigerवाघMaharashtraमहाराष्ट्र