शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय स्थैर्य, मात्र अर्थव्यवस्थेवर ताण येईल; भेंडवड येथील घटमांडणी भाकितातून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:38 IST

राज्यासह देशातील राजकीय स्थिती सध्या स्थिर राहण्याचे संकेत भेंडवड येथील पारंपरिक घटमांडणीच्या भाकितातून मिळाले आहेत.

जयदेव वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद (जि. बुलढाणा) : राज्यासह देशातील राजकीय स्थिती सध्या स्थिर राहण्याचे संकेत भेंडवड येथील पारंपरिक घटमांडणीच्या भाकितातून मिळाले आहेत. नैसर्गिक संकटांची शक्यता, पिकांवरील रोगराईचे सावट व युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर व अर्थव्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेले हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातून शेतकरी व नागरिकांनी उपस्थिती लावली. 

तूर्तास सत्तांतर नाही: पानविडा हा राजा व सत्तेचे प्रतीक मानला जातो. यंदा विड्याचे पान व सुपारी स्थिर आढळल्याने सत्तांतराची शक्यता नसून, विद्यमान सत्ता कायम राहील, असा अर्थ लावण्यात आला. बाह्य शत्रूंच्या हालचाली व नैसर्गिक संकटांमुळे सत्ताधाऱ्यांवर ताण वाढण्याची शक्यता नाही. अर्थव्यवस्थेबाबतही इशारा देण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीसोबतच अवकाळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पिकांवर रोगराई, मानवी आरोग्यावरही परिणाम 

घटमांडणीतील निरीक्षणानुसार भूकंप, महापूर, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भादली धान्य सर्वत्र पसरल्याने पिकांवर रोगराईचे सावट राहील तसेच मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मंदी वाढण्याची शक्यता 

करंजी फुटलेली आढळल्याने आर्थिक अस्थिरतेचे संकेत मिळाले आहेत. महागाई, मंदी वाढण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Political stability, economic strain predicted in Bhendwad Ghat Mandani forecast.

Web Summary : Bhendwad's forecast indicates political stability but warns of economic strain due to natural disasters and potential conflicts. Crop diseases and human health concerns are also highlighted. The current government is likely to continue despite challenges.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी