शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

Madhav Pawar: वेदनांशी मैत्री करणारे कवी माधव पवार यांचे निधन, सोलापूरात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:21 IST

Poet Madhav Pawar Passes Away: ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे बुधवारी पहाटे निधन झाले असून आज सायंकाळी मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

प्रेतास घालूनी वस्त्रे, हे सत्य झाकले कोणी...
त्या अग्निमध्ये वितळे, देहाचे फसवे लोणी...

मृत्यूचं वास्तव अशा पंक्तीमधून व्यक्त करणारे अन् शारिरिक वेदनांशी दोस्ती करून मृत्यूला एक उत्सव मानणारे मराठीतील ज्येष्ठ कवी माधव पवार (७१, रा. निर्मिती टॉवर्स, मोदीखाना ) यांचे बुधवारी पहाटे चार वाजता येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

कवी माधव पवार हे गेल्या बारा ते तेरा वर्षापासून मूत्रपिंडाच्या विकारानं आजारीच होते. पण डायलिसिस करून आल्यानंतर ते साहित्यिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहायचे. उत्तम कविता व सूत्रसंचालन ते करायचे. महिन्याभरापूर्वीच त्यांची प्रकृती खुपच खालावली होती. डायलिसिसलाही शरीर प्रतिसाद देत नव्हते. उपचाराची सर्व पध्दती निष्क्रिय ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून घरीच ठेवण्याचा व उपचार करण्याचा सल्ला दिला. दिवसेंदिवस प्रकृती ढासळत होती. त्यातच त्यांचे पहाटे प्राणोत्क्रमण झाले. 

त्यांच्यावर तब्बल १६०० पेक्षा अधिक डायलिसिस करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याच्या वेदनाही त्यांनी काव्यातून व्यक्त करत त्याचा आनंद लुटला. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या साहित्यिक विश्वावर शोककळा पसरली आहे. एक संवेदनशील कवी, उत्तम तक्ते, नकलाकार, उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून उभ्या महाराष्ट्राला अन् ते सोलापूरकरांना त्यांची ओळख होती. कवी रा.ना. पवार यांचे सुपुत्र म्हणून ओळखीशिवाय कवी माधव पवार यांच्या प्रतिभेचा नावलौकिक साहित्य दरबारात विशेष होता. पार्श्वगायक गायक सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी कवी माधव पवारांची गीतं, भक्तीगीतं अन् लोकगीतं गायिली आहेत. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कविवर्य फ.मुं. शिंदे, गजलकार सुरेश भटांसह दिग्गजांशी त्यांचा स्नेह अधिक चांगला होता. कवीवर्य ग्रेस यांना ते पितृतूल्य मानत. ग्रेस यांचाही त्यांच्यावर विशेष लोभ होता. ग्रेस जेव्हा पुण्यातील रूग्णालयात शेवटचे उपचार घेत होते, तेव्हा माधव पवार आवर्जून तिथे सेवेत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Poet Madhav Pawar, who befriended pain, passes away in Solapur.

Web Summary : Veteran Marathi poet Madhav Pawar (71) passed away in Solapur due to kidney ailment. Known for his poems on life, death, and pain, he was also a skilled compere and singer. His funeral was held in Modi Smashanbhumi.
टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू