शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

याचिकाकर्त्या २४ कैद्यांच्या शिक्षेचा कालावधी 6 आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश

By admin | Updated: September 8, 2016 20:02 IST

कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ उलटून गेल्यानंतरही गृह विभागाने त्यांच्या शिक्षेच्या कालावधी निश्चितीचा निर्णय घेतला नाही.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 8 - कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ उलटून गेल्यानंतरही गृह विभागाने त्यांच्या शिक्षेच्या कालावधी निश्चितीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे ३९ कैद्यांनी खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांच्या अनुषंगाने २४ कैद्यांसंदर्भात गृह विभागाने सहा आठवड्यात निर्णय जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी दिला आहे. वरील विहीत मुदतीत निर्णय घेतला नाही तर गृह विभागाचे प्रधान सचिव यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. पैठण येथील खूल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे दिलीपकुमार क्षिरसागर यांच्यासह वीस आणि बाबासाहेब पातोड यांच्यासह १९ अशा ३९ कैद्यांनी अ‍ॅड. रुपेश जैस्वाल यांच्या मार्फत खंडपीठात दोन याचिका दाखल केल्या होत्या. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर किमान १४ वर्षाची शिक्षा पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधीत कैद्यांच्या वर्तवणूकीच्या अहवालावरुन कैद्याने अठरा वर्ष , वीस किंवा चोवीस वर्षाची शिक्षा भोगावी याचा निर्णय राज्य शासनाने घेणे अपेक्षीत असते. कैद्याची मुळ म्हणजे १४ वषार्ची शिक्षा पुर्ण होईपर्यंत पुढील शिक्षा ठरवणे अपेक्षीत असताना, या कैद्यांना २४ ते २६ वर्ष उलटूनही राज्य शासनाने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेतला नाही. त्यांचे नातेवाईक गृह विभागात चकरा मारत असता त्यांनाही दाद देण्यात आली नाही. म्हणून याचिका दाखल करण्यात आल्या.याचिका दाखल झाल्यावर शासनाने ११ कैद्यांची मुक्तता केली. ४ कैद्यांच्या शिक्षेच्या कालावधीसंदर्भात संबंधीत कारागृहाकडे अहवाल पाठवले. उर्वरित २४ कैद्यांच्या संदर्भात निर्णय झालेला नव्हता. याचिकेच्या सुनावणीनंतर खंडपीठाने उर्वरित सर्व कैद्यांच्या संदर्भात सहा आठवड्यात निर्णय घ्यावा अन्यथा गृह विभागाच्या प्रधान सचिवांना जबाबदार धरण्यात येईल, असे आदेश देऊन याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रुपेश जैस्वाल तर शासनातर्फे अ‍ॅड. एम. एम. नेरलीकर यांनी काम पाहिले.