'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 10:35 AM2020-08-20T10:35:11+5:302020-08-20T11:50:31+5:30

Sushant Singh Rajput Death Case: सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे रोहित पवार म्हणाले.

'people will not forgive you.'; Rohit Pawar warn BJP on Sushant-CBI inquiry | 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

Next

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही बिहार सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. यामुळे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर भाजपाने टीका सुरु केली. यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.', अशा शब्दांत भाजपाला सुनावले आहे. 


सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे रोहित पवार म्हणाले. तसेच शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सर्वोच्च न्यायालयावर टीका करत होते. याचा आज सर्वोच्च न्यायालयावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टीका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. 


यानंतर पुन्हा काही ट्विट करत रोहित पवार यांनी भाजपाला सुनावले आहे, आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर 'मेरा अंगण मेरा रणांगण' या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केले आहे, अशी टीका करतानाच 'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.' अशा शब्दांच सुनावले आहे. 


तसेच सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरे झाले. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव देशात कमी करण्याचं 'उदात्त' कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना 'साष्टांग दंडवत', असेही म्हटले आहे. 


पार्थ पवारच्या ट्विटवर प्रतिक्रिय़ा
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते ट्विट केले यावर रोहित पवार म्हणाले की, पार्थनं काय ट्विट केले ते माहिती नाही, हे प्रकरण कोर्टात होतं, सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबत पुढे काय भूमिका घ्यायची हा राज्य सरकारचा विषय आहे अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना रोहित यांनी दिली आहे. मात्र पार्थ यांची भूमिका राष्ट्रवादीच्या विरोधातली असल्याचीही चर्चा आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले

एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब

मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात

Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Web Title: 'people will not forgive you.'; Rohit Pawar warn BJP on Sushant-CBI inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.