Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 10:34 AM2020-08-19T10:34:19+5:302020-08-19T10:44:19+5:30

Gold Rates Today: रशियाच्या कोरोना लसीमुळे गेल्या आठवड्यात जवळपास 6 हजारांची घट पहायला मिळाली होती. सोन्याच्या दराने 49000 चा तळ गाठला होता.

Gold Rates Today: After a day of shining, gold fall again; instant know today's rate | Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

googlenewsNext

रशियाच्या कोरोना लसीमुळे गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात (Gold Rate) कमालीची घसरण झाली होती. मात्र, मंगळवारी सोन्याच्या दराने (Gold price hike) पुन्हा उसळी घेतली होती. आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी 5 ऑक्टोबरच्या वायदा बाजारात सोन्याची किंमत 53,571 रुपये प्रति 10 ग्रॅम (Gold Price Today) वर सुरु झाली होती. आज यामध्ये 121 रुपयांची घट झाली. 


बुधवारी सोन्याच्या वायदा बाजाराची सुरुवात 53,450रुपये प्रति तोळा एवढी झाली. सोन्याच्या दरातील घसरण थांबायचे किंवा रिकव्हर होण्याचे नाव घेत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज बाजार सुरु होताच सोन्याच्या दराने काही मिनिटांतच 350 रुपयांची घसरण नोंदविली आणि 53,125 रुपयांच्या किमान स्तरावर जाऊन पोहोचले. यामुळे सोने त्याची ओपनिंग प्राईस 53,450रुपये गाठण्यात अपयशी ठरले. 

Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता


रशियाच्या कोरोना लसीमुळे गेल्या आठवड्यात जवळपास 6 हजारांची घट पहायला मिळाली होती. सोन्याच्या दराने 49000 चा तळ गाठला होता. मात्र, पुन्हा सोन्याचा वायदा बाजार वाढला होता. आर्थिक मंदी, अमेरिका-चीनमध्ये तणाव आणि डॉलरची घसरण सोन्याच्या दरात वाढ होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. गुंतवणूदारही सोने, चांदीकडे आकर्षित होत आहेत. कारण कोरोनाचे संकट अद्याप थांबण्याचे नाव घेत नाहीय. भारतासह जगभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागले आहेत. 


सोन्यात गुंतवणूक करावी का?
कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. पण येत्या दिवळापर्यंत हेच सोने 70000 वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा जानेवारी ते आतापर्यंत सोन्याने चांगला परतावा दिला आहे. काही तज्ज्ञांनुसार सोने 70000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गनच्या एका अहवालानुसार सोने पुढील दोन महिन्यांत 70000 रुपयांवर जाणार आहे. कोरोनाचे संकट जरी टळले तरीही जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली मंदी एवढ्यात सुधरणारी नाही. यामुळे जेव्हा आर्थिक संकट सुरुच राहणार तेव्हा सोन्याची मागणी वाढत राहणार आहे. सोन्यासोबत चांदीदेखील सारखी वाढत आहे. सोनो आणि चांदी सध्या कधी नव्हे तेवढ्या दरावर व्यापार करत आहेत. दोन्ही धातू नवनवीन उंची गाठत आहेत. मात्र, अजून यामध्ये वाढ होण्याची आशा आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?

वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का

Indian Railway Recruitment 2020: परिक्षा नाही! रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार

SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा

महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग

 

Web Title: Gold Rates Today: After a day of shining, gold fall again; instant know today's rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.