बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:40 AM2020-08-19T08:40:19+5:302020-08-19T08:56:13+5:30

अमरेली जिल्ह्यातील विपुल खेलैया याने दावा केला आहे की तो आपल्या झोपडीमध्ये झोपला होता. तेव्हा त्याच्या छातीवर एक भुकेलेली सिंहीण येऊन बसली.

lion came and sat on the chest of the sleeping young man; See what happens next? | बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?

बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?

Next

जर कोणाच्या छातीवर वाघ, सिंहासारखा हिंस्त्र प्राणी येऊन बसला तर त्याची हालत काय होईल? साधा विचार करूनच हृदयाचे ठोके वाढू लागतात, मग प्रत्यक्षात जर आपल्यासोबतच असे झाले तर मोठा अॅटॅकच यायचा. मग ज्याच्या सोबत हा प्रकार घडला त्याची काय हालत झाली असेल? गुजरातच्या अमरेलीमध्ये हा प्रकार घडला आहे. 


अमरेली जिल्ह्यातील विपुल खेलैया याने दावा केला आहे की तो आपल्या झोपडीमध्ये झोपला होता. तेव्हा त्याच्या छातीवर एक भुकेलेली सिंहीण येऊन बसली. टाईम्स ऑफ इंडियाने याचे वृत्त दिले आहे. यानुसार विपुल सावरकुंडला तालुक्यातील अभारमपारा गावाचा रहिवासी आहे. त्याने सांगितले की तो रात्री झोपला होता. तेव्हा अचानक एक सिंहीण त्याच्या छातीवर येऊन बसली. हे पाहताच त्याला मृत्यू समोर दिसला. मात्र, लगेचच मनावर ताबा मिळवत धाडस केले. पूर्ण मानसिक आणि शारिरीक ताकद लावून त्या सिंहीणीला हाताने जोरदार धक्का दिला. 

हा आघात सिंहीणीला नवा होता. अचानक एखादा प्राणी निपचित पडून राहून प्रतिहल्ला करतो आणि दूर ढकलतो, हे पाहून सिंहीणीला धक्का बसला व ती जंगलात पळून गेली. सिंहीणीला समजले की, तो तिचा शिकार नव्हता, असे खेलैया याने सांगितले. झोपलेला असताना छातीवर अचानक मोठे वजन पडल्याचे वाटले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सिंहीण मला पाहत आहे. तिच्या डोळ्यात मला माझा मृत्यू दिसला होता, असे त्याने सांगितले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का

Indian Railway Recruitment 2020: परिक्षा नाही! रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार

SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा

महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग

Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

Web Title: lion came and sat on the chest of the sleeping young man; See what happens next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gujaratगुजरात