Beware, on sell of old gold or jewellery; Possibility of charging GST of 3 % | Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

आता जुन्या सोन्यावर किंवा दागिन्यांवरही जीएसटी लावण्यात येणार आहे. जुने सोने विकायला गेल्यास त्यावर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागण्याची शक्यता आहे. जीएसटी समितीच्या पुढील बैठकीत यावर निर्णय होणार आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ही माहिती दिली आहे. याचाच अर्थ जुने सोने विकाय़ला गेल्या त्यावर मिळणारा फायदा कमी होणार आहे. 


थॉमस इसाक यांनी सांगितले की, नुकत्याच काही  राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या प्रस्तावावर सहमती मिळाली आहे. या बैठकीत जुन्या सोन्यावर तीन टक्के जीएसटी आरसीएम (रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम) द्वारे आकारण्यात येण्याबाबत ठरले आहे. यावर आता समितीचे अधिकारी नियमावलींचा विचार करणार आहेत. 


वृत्तसंस्था पीटीआयनुसार या मंत्री गटामध्य़े केरळ, बिहार, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे अर्थमंत्री सहभागी आहेत. सोने आणि बहुमुल्य रत्नांच्या वाहतुकीसाठी ई-वे बिल सुविधा सुरु करण्यासाठी या मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली होती. कोरोना काळामुळे या मंत्र्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. 


नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर एखादा ज्वेलर ग्राहकाकडून जुने दागिने खरेदी करत असेल तर रिव्हर्स शुल्काच्या रुपात तो ग्राहकाकडून 3 टक्के जीएसटी वसूल करणार आहे. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे दागिने विकत असाल तर तुमच्याकडून तीन हजार रुपये कापून घेतले जाणार आहेत. 


दुकानदारांसाठी ई-वे बिल सक्तीचे
मंत्र्यांच्या या जीओएमने सोन्याचे दागिने किंवा सोने खरेदी विक्रीसाठी प्रत्येक दुकानदाराला लिए ई-इनव्हॉईस (ई-बिल) काढावे लागणार आहे. करचोरी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. आताही अनेक शहरांत ज्वेलर्स सोने खरेदी विक्रीचे कच्चे बिल देतात. काळ्या पैशांवर वचक ठेवण्यासाठी नवीन प्रणाली आणण्यात येणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Beware, on sell of old gold or jewellery; Possibility of charging GST of 3 %

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.