शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पार्थ पवारांच्या ‘जय श्रीराम’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:21 AM

राष्ट्रवादीत अस्वस्थता असून पक्षाची वैचारिक कोंडी झाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत आयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास शुभेच्छा देणारे खुले पत्र लिहिल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता असून पक्षाची वैचारिक कोंडी झाल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.पार्थ पवार यांनी दुसऱ्यांदा पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करून पार्थ यांनी पहिल्यांदा पक्षाला अडचणीत टाकले. तर आता राम मंदिरासंदर्भात ‘वेगळी’ भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरल्यानंतर, ‘मंदिर उभारल्याने कोरोना जाईल असे काहींना वाटते’ अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी भूमिपूजनाचा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला दिला होता.पार्थ यांनी आपल्या खुल्या पत्रात, ‘आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत. राम जन्मभूमी प्रकरणातून आणखी एक मोठा धडा आपण शिकला पाहिजे. विजयात आपण विनम्र असले पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.‘ती’ वैयक्तिक भूमिकाखा. सुप्रिया सुळे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत पार्थची ती वैयक्तिक भूमिका आहे, असे सांगून पक्षाला पार्थपासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :parth pawarपार्थ पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRam Mandirराम मंदिर