पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत

By Admin | Updated: June 20, 2014 02:27 IST2014-06-20T02:27:28+5:302014-06-20T02:27:28+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे-मुंडे यांना भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीमध्ये घेण्याचा निर्णय आज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

Pankaj Munde BJP Core Committee | पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत

पंकजा मुंडे भाजपाच्या कोअर कमिटीत

>ओबीसी समाजाशी राजकीय सोयरिक : केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याची शिफारस
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे-मुंडे यांना भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीमध्ये घेण्याचा निर्णय आज कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. दिवंगत मुंडे यांच्या माध्यमातून भाजपाशी जोडला गेलेल्या ओबीसी समाजाशी राजकीय सोयरिक कायम ठेवण्याचा प्रय} यानिमित्ताने भाजपाने केला आहे. 
याशिवाय पंकजा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे असा ठरावही आजच्या बैठकीत करण्यात आला असून, तशी शिफारस प्रदेश भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. पंकजा सध्या विधानसभेच्या सदस्य आहेत. तसेच भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षही आहेत. वडिलांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभा जागेवर त्या लढतील, असे मानले जाते. त्याबाबतचा निर्णय पक्षाने त्यांच्यावर सोडला आहे. 
 प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटन सचिव रवी भुसारी यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक आज येथे झाली. मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर ओबीसी विरुद्ध ब्राrाण असा वाद भाजपात निर्माण केला जात आहे. पक्षाबाहेरील काही लोकांनी या वादाला खतपाणी घालण्याचे काम चालविले आहे. या पाश्र्वभूमीवर, मुंडे समर्थक आणि ओबीसी समजात चांगला संदेश जावा म्हणून पंकजा यांचे महत्त्व पक्षाने लगेच वाढविले असल्याचे म्हटले जाते. मुंडे यांच्या निधनानंतर राज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अधिक लक्ष घालतील, असे म्हटले जात आहे. 
कोअर कमिटीमध्ये ते आधीपासूनच पदसिद्ध सदस्य आहेत. राष्ट्रीय राजकारणात असल्याने ते समितीच्या बैठकांना येत नव्हते. गोपीनाथ मुंडे नियमितपणो येत असत असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.  विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी कोअर कमिटीची पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत लवकरच दिल्लीत बैठक होणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Pankaj Munde BJP Core Committee