शनिवारपासून कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीही सकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोरची ते बोटेकसा मार्गे छत्तीसगडकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. भीमपूर नाल्यावरील ...
विष्णूपूर जंगलात मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना झाली. त्यानुसार जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणची तपासणी केली असता, ४५ ड्रम जमिनीत गाडून ठेवल्याचे आढळून आले. या दारूची किंमत २ लाख ५० हजार रूपये एवढी होते. गाडलेला मोहफूल सडवा बाहेर क ...
आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार २०४ स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९ हजार ९५३ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील ९ हजार ६१५ अहवाल निगेटिव्ह आलेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २८६ असून रविवारी ६ जण कोरोनामुक्त झालेत. आतापर् ...
राज्य सरकार आणि रेल्वे विभागाच्या सहकार्याने रेल्वेची प्रतिकृती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी तात्काळ सर्व प्रक्रिया पार पाडून २ ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. धामनदीच्या एकाच किनाऱ्यावरी ...
वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षत ...
ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, त ...
मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकीबाबत) नियम १९५९ मधील कलम (७) अन्वये ग्रामसभा घेण्याबाबत तरतूद आहे. या ग्रामसभेच्या आयोजनापूर्वी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात येते. परंतु सद्यस्थिीतीत कोविड-१९ आजाराने थैमान घातले आहे. या आजाराच्या पार्श्वभु ...
नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वग ...
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील २०, सालेकसा ४, देवरी २, आमगाव ५, ...
जून, जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. जवळपास १ लाख हेक्टरवरील रोवणीची कामे अद्यापही खोळंबली आहेत. पावसाअभावी रोवणी वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती नि ...