सोशल मीडियावरून होणार महिलांच्या समस्यांचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:33+5:30

मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकीबाबत) नियम १९५९ मधील कलम (७) अन्वये ग्रामसभा घेण्याबाबत तरतूद आहे. या ग्रामसभेच्या आयोजनापूर्वी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात येते. परंतु सद्यस्थिीतीत कोविड-१९ आजाराने थैमान घातले आहे. या आजाराच्या पार्श्वभुमीवर कोविड आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे.

Women's issues will be solved through social media | सोशल मीडियावरून होणार महिलांच्या समस्यांचे निवारण

सोशल मीडियावरून होणार महिलांच्या समस्यांचे निवारण

Next
ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ग्रामसभा नाही : व्हाट्सअ‍ॅप, ईमेल व मोबाईलचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गावातील महिलांच्या समस्या गावातीलच ग्रामसभेत सोडविल्या जायच्या. परंतु यंदा कोरोने थैमान घातल्याने यंदा ग्रामसभा होणार नाहीत असे चित्र स्पष्ट असताना महिलांच्या गाºहाणी, तक्रारी सोडविण्यासाठी शासनाने नवीन शक्कल लढविली आहे. मोबाईल, ईमेल व व्हाट्सअ‍ॅपवर महिलांच्या तक्रारी मागवून त्या तक्रारी सोडविण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्रालयाने दिले आहे. जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या समस्या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत.
मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकीबाबत) नियम १९५९ मधील कलम (७) अन्वये ग्रामसभा घेण्याबाबत तरतूद आहे. या ग्रामसभेच्या आयोजनापूर्वी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात येते. परंतु सद्यस्थिीतीत कोविड-१९ आजाराने थैमान घातले आहे. या आजाराच्या पार्श्वभुमीवर कोविड आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. यासाठी राज्यात ग्राम पातळीवर घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर महिला ग्रामसभा देखील आयोजित करता येणार नाही.
ग्रामसभा पंचायतराज व्यवस्थेचे अविभाज्य अंग आहे. ग्रामसभेद्वारे गावपातळीवरील नागरिकांच्या विविध समस्या व शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण होत असते. विशेष महिला ग्रामसभेच्या अनुषंगाने गावातील प्रश्नांबाबत तसेच त्यांच्या अडचणीबाबत महिला ग्रासभेत सक्रीय सहभाग दर्शवित असतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्रामसभा घेता येणार नाही. मात्र ग्रामसभेच्या आयोजनाअभावी महिलांच्या तक्रारी, अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी ग्राम पातळीवर डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून व्हाट्सअ‍ॅप, ईमेल व फोन या साधनांच्या माध्यमातून संबधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी यांनी महिलांच्या तक्रारी, अडचणी प्राप्त करून त्यांचे निराकरण करणार आहेत.
तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांनी संबधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकारी व महिला प्रतिनिधींशी संपर्क साधून गाव पातळीवर येणाºया अडचणींचे व समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायत असून अर्जुनी-मोरगाव ७०, सडक-अर्जुनी ६३, गोरेगाव ५५, देवरी ५५, सालेकसा ४१, आमगाव ५७, तिरोडा ९५, गोंदिया तालुक्यात १०९ ग्रामपंचायत आहेत. या सर्व ग्रामपंचायतमधून आधी महिलांच्या तक्रारी मागवून त्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य सरकारने स्वातंत्र्यदिनानिमित्त दिलेल्या सूचनांचे पालन जिल्ह्यात केले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी काय-काय करावे यासंदर्भात दिलेल्या सूचनांचे सर्व ग्रामपंचायती पालन करणार आहेत.
- नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) जि.प.गोंदिया.

कोविड काळात कार्य करणाऱ्यांचा सत्कार
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने कोविडच्या कामात रात्रंदिवस राबणाºया कोविड योध्दांचा सत्कार स्वातंत्रदिनी करावा असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे गाव, तालुका, जिल्हा पातळीवर ध्वजारोहणानंतर कोविड योध्दांचा सत्कार फिजिकल डिस्टन्स ठेवून करण्यात येणार आहे.

Web Title: Women's issues will be solved through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला