जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:35+5:30

बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २५ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीय हादरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्यविषयक उपयायोजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. गुरूवारी (दि.१३) आढळलेल्या १९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यात ४ रुग्ण आढळले आहे.

Corona patient growth rate maintained in the district | जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम

जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम

Next
ठळक मुद्दे१९ बाधितांची भर : १० कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त, २६२ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. मागील १२ दिवसात ४५० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. गुरूवारी (दि.१३) आणखी १९ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७२७ वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. तर १० कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत एकूण ४२८ जणांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र आहे.
बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी जिल्ह्यात चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर २५ कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्हावासीय हादरले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्यविषयक उपयायोजनांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना नियंत्रणाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. गुरूवारी (दि.१३) आढळलेल्या १९ कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यात ४ रुग्ण आढळले आहे. गोंदिया शहरातील सिव्हील लाईन येथील एक, दवनीवाडा, एकोडी व काटी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. तिरोडा तालुक्यातील सात रुंग्णामध्ये रामनगर तिरोडा येथील दोन रुग्ण, बिरसी येथील व सर्रा येथील प्रत्येकी दोन रुग्ण, एक रुग्ण गराडा येथील आहे.
४ रुग्ण गोरेगाव तालुक्यात आढळले असून कलपाथरी व घोटी येथील प्रत्येकी एक रुग्ण व तुमखेडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. आमगाव तालुक्यात चार रुग्ण आढळले असून यामध्ये आमगाव, बनगाव, डोंगरगाव व कालीमाटी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनावर मात मात केलेल्यांमध्ये गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी येथील एक, तर ९ रु ग्ण तिरोडा तालुक्यातील असून ७ रुग्ण हे मुंडीपार व २ रुग्ण घोगरा येथील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण १२ हजार १४७ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी ११ हजार ६९ नमुने निगेटिव्ह आले आहे.तर ७२७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर २६६ नमुयांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. २१५ स्वॅब नमुन्याचा अहवाल अनिश्चित आहे.

Web Title: Corona patient growth rate maintained in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.