सायबरच्या दहा गुन्ह्यांतील ११ लाख रुपये झाले वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:37+5:30

ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, तर दोन गुन्हे सोशल मीडियावरून झालेल्या फसवणुकीचे आहे. ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेल्या २६ जणांचे अर्ज आले होते.

Rs 11 lakh recovered from 10 cyber crimes | सायबरच्या दहा गुन्ह्यांतील ११ लाख रुपये झाले वसूल

सायबरच्या दहा गुन्ह्यांतील ११ लाख रुपये झाले वसूल

googlenewsNext
ठळक मुद्दे२६ तक्रार अर्जही निकाली : बँकेशी निगडीत गुन्हे थांबले, सोशल मीडियाद्वारे झाली होती अनेक नागरिकांची फसगत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. जुलै अखेरपर्यंत १० गुन्हे दाखल झाले, तर २६ तक्रार अर्ज वेळेत आल्याने होणारे नुकसान टाळता आले. सायबर सेलने दहा गुन्ह्यातील फसवणुकीच्या १५ लाख रकमेपैकी ११ लाख वसूल करण्यात यश मिळविले आहे. सध्या बँकेशी निगडीत फ्रॉड कमी झाले असून सोशल मीडियावरची फसगत वाढली आहे.
ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदार व्यक्ती तातडीने सायबर सेलकडे आल्यास त्याचे झालेले नुकसान वसूल करण्याची दाट शक्यता असते. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. दहा गुन्हे आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल झाले होते. त्यामध्ये आठ गुन्हे बँकेशी निगडीत फसवणुकीचे, तर दोन गुन्हे सोशल मीडियावरून झालेल्या फसवणुकीचे आहे. ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेल्या २६ जणांचे अर्ज आले होते. हे अर्ज तातडीने आल्याने एक लाख २० हजार रुपयांची रक्कम सायबर सेलला रिकव्हर करता आली. यातून ग्राहकांचे नुकसान टळले, तर आयटी अ‍ॅक्टच्या दहा गुन्ह्यात १५ लाखांची फसवणूक झाली होती. त्यातील ११ लाख रुपये सायबर टीमने वसूल केले आहे. गेल्या काही दिवसात बँक फ्रॉडचे प्रमाण कमी होत आहे. नागरिक सतर्क झाल्याने ओटीपी, पीन नंबर व इतर माहिती ते फोनवर शेअर करत नाही. त्यामुळेच आता फ्रॉड करणाऱ्यांनीही आपला मोर्चा बदलविला असून ते चांगल्या वाहनांची कमी किमतीत विक्री, उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवून सोशल मीडियातून फ्रेण्डशीप व नंतर फसवणूक करत असल्याची प्रकरणे घडत आहेत. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने सोशल मीडियाचे अ‍ॅप वापरताना टू स्टेप व्हेरिफिकेशन सिस्टीम अपग्रेड करणे गरजेचे आहे.

ई-वॉलेटमधील अ‍ॅपच वापरा - एपीआय अमोल पुरी
आरबीआयने ऑनलाईन व्यवहारासाठी असलेल्या काही अ‍ॅपला ई-वॉलेट कॉमर्समधून वगळले आहे. त्यामुळे हे अ‍ॅप वापरताना काही अनियमितता झाल्यास पैसे परत मिळणार नाही. यात फोन पे व गुगल पे हे दोनही अ‍ॅप वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीय असलेल्याच अ‍ॅपचा वापर करावा. ज्यांचा समावेश ई-वॉलेटमध्ये आहे. जेणेकरून काही अनियमितता झाल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता राहते, अशी माहिती सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक अमोल पुरी यांनी दिली.

Web Title: Rs 11 lakh recovered from 10 cyber crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.