वडेगाव-साकोली रस्ता वाहून गेल्याने रहदारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:00:29+5:30

नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वगावी परत आणण्यात आले. तिरोडा- लाखनी मार्गे महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्र मांक २४८ वर मागील वर्षभरापासून बांधकाम सुरू आहे.

Vadegaon-Sakoli road closed | वडेगाव-साकोली रस्ता वाहून गेल्याने रहदारी बंद

वडेगाव-साकोली रस्ता वाहून गेल्याने रहदारी बंद

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक खोळंबली : शेतकऱ्यांची वाढली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : तिरोडा साकोली राज्यमार्गावरील वडेगावजवळील निर्माणाधीन पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने रविवारी (दि.९) या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.
रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसाने वडेगाव गायखुरीजवळ असलेल्या पुलाजवळील पर्यायी रस्ता पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेला. यामुळे तिरोडा-साकोली मार्गावरील वाहतूक खोंळबली आहे.
नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वगावी परत आणण्यात आले. तिरोडा- लाखनी मार्गे महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्र मांक २४८ वर मागील वर्षभरापासून बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीस आहे.
कंपनीने या पुलाचे बांधकाम तुमसर येथील एका कंत्राटदारास दिल्याची माहिती आहे. शिवालय कंपनीद्वारे अतिशय संथगतीने व निष्काळजीपणे या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवालय कंपनीद्वारे ठिकठिकाणी रस्त्यालगत खोदकाम करून बांधकाम अर्धवट ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर फसल्याचा घटना घडल्या आहेत. याबाबद कंपनीकडे वारंवार तक्र ार करूनही कंपनी व संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Vadegaon-Sakoli road closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.