शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 6:09 PM

३७० कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता, मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे़...

पुणे : काश्मीर हा भारताचा अभिवाज्य भाग असून, जम्मू-काश्मीरशिवायभारत हा अपूर्ण आहे़. ३७० कलम हटविल्यामुळे भारत भविष्यात दहशतवादी कारवायांपासून मुक्त झालेला देश असेल़. दरम्यान, आता पाकव्याप्त  काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे़, असे प्रतिपादन एआयएटीएफचे चेअरमन एम़.एस़.बिट्टा यांनी केले़.  श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने अखंड हिंदुस्थानातील गणेशोत्सवाच्या छायाचित्रांच्या चित्रग्रंथ या स्मरणिकेचे प्रकाशन बिट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता, उत्सवप्रमुख पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सीरिचच्या अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे विवेक खटावकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी व अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, राजाराम मंडळाचे युवराज निंबाळकर हे उपस्थित होते़.     एम.एस. बिट्टा म्हणाले, आपल्या देशातील राजकीय पक्षांचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी ध्येय मात्र एकच असायला हवे. ३७० कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता, मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे़ डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांच्या मनात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा निर्माण करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी यांनी आपल्या हाताने दुष्ट व अन्याय्य प्रवृत्तींच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देणार्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. शिवाय भाऊसाहेब रंगारीं यांचा टिळकांच्या नेतृत्वाला पाठींबा होता. तर, केसरी मध्ये भाऊसाहेबांच्या कार्याचा गौरव केसरी मध्ये टिळकांनी केल्याचे आढळते.  यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी केले. तसेच सुत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.------------------------

टॅग्स :PuneपुणेPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिकIndiaभारत