शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या वारसांना एक लाखाची मदत

By admin | Updated: June 22, 2015 03:19 IST

मालाड मालवणी येथील विषारी दारूकांडातील बळींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून १ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे

मुंबई : मालाड मालवणी येथील विषारी दारूकांडातील बळींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून १ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी केली. ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष या दुर्घटनेत मरण पावला त्या कुटुंबांना चरितार्थाकरिता सरकारच्या वतीने छोटे-मोठे साधन उपलब्ध करून देण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. विषारी दारू प्राशन केल्यामुळे मालवणीत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी गुन्हे शाखेने आधीच पाच जणांना अटक केली आहे. त्यापाठोपाठ गावठी दारूच्या अवैध व्यवसायातील क्वीन ममता लक्ष्मण राठोड (३०) उर्फ ममता आण्टी उर्फ मनेका अक्का आणि अ‍ॅग्नेस ग्रेसी उर्फ ग्रेसी आण्टी या कुख्यात महिलांनाही गुन्हे शाखेने गजाआड केले. तावडे यांनी या परिसरास भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून मदत दिल्याचे तावडे म्हणाले. या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत त्यांनी सहायक पोलीस आयुक्त फतेहसिंग पाटील व जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्याशी चर्चा केली.