शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राज्यातील रक्तसाठ्याची माहिती एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:20 AM

- राजकुमार चुनारकर  चिमूर (चंद्रपूर) : राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये असलेल्या रक्तसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ...

- राजकुमार चुनारकर चिमूर (चंद्रपूर) : राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये असलेल्या रक्तसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलची वेबसाईट तयार केली आहे. यावरुन ही माहिती कुणालाही उपलब्ध होणार आहे.‘महाएसबीटीसी डॉट ओआरजी’ ही बेवसाईट असून त्यावर फाईंड ब्लड या आॅप्शनला क्लिक करताच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची माहिती तत्काळ मिळणार आहे. तसेच या बेवसाईटवर रक्तदात्यांना आपली नोंदही करता येणार आहे.२०१७ रोजी ही वेबसाईट सुरू करण्यात आली; मात्र तिच्यावर नियमित माहिती दिली जात नव्हती. शासनाने याबाबत कडक धोरण राबविल्याने सदरची वेबसाईट दररोज अपडेट करण्यात येत आहे.सध्या शासकीय रूग्णांलयांमध्ये काही रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना बऱ्याचवेळा रक्त नाही, असे उत्तर मिळते. अशावेळी गप्प राहण्याव्यतिरिक्त तरणोपाय नसतो. ‘महाएसबीटीसी डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर रक्त किती आहे, कोणत्या पेढीत आहे, त्याची वर्गवारीही मिळते.राज्यात ४६७ रक्तपेढ्याराज्यातील ३६ जिल्ह्यात ४६७ रक्तपेढ्या आहेत. सर्वाधिक ८९ मुंबईमध्ये असून पुणे ४८ तर ठाणे येथे ४२ रक्तपेढ्या आहेत. कोकणात ६४ रक्तपेढ्या आहेत.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी