शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजावर बंदी येणार ?

By admin | Updated: January 20, 2015 02:02 IST

पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापर व विक्रीवर कायमची बंदी आणण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दहा आठवड्यांचा अवधी दिला आहे़

नागपूर : पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापर व विक्रीवर कायमची बंदी आणण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दहा आठवड्यांचा अवधी दिला आहे़ १२ जानेवारी रोजीच्या आदेशानुसार मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून त्यात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर व विक्री करण्यावर कायमची बंदी आणण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्याची विनंती केली होती. परंतु, न्या़ अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी सोमवारी कायद्यानुसार निर्णय घेण्यापूर्वी करावी लागणारी प्रक्रिया लक्षात घेता शासनाला १० आठवड्यांचा अवधी दिला. ७ जानेवारी रोजी सहपोलीस आयुक्तांनी एक आदेश जारी करून ८ ते ३१ जानेवारीपर्यंत पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. याविरुद्ध रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत जारी हे आदेश अवैध व मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)नायलॉन मांजाचेघातकत्व मान्यपतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरणे धोकादायक असल्याचे शासनाने मान्य केले आहे. नायलॉन मांजा सहज तुटत नाही. यामुळे माणसे, पक्षी व जनावरांना गंभीर इजा पोहोचते. अनेकदा जीवितहानी होते. हा मांजा दीर्घकाळापर्यंत नष्ट होत नसल्यामुळे पतंग उडविण्याचा हंगाम संपल्यानंतरही धोका कायम राहतो, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.