शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 05:39 IST

मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे.

महेश घोराळेलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे. जिथे पिकं होती तिथे दगड-गोटे आणि वाळूचा थर पसरला. मातीचा पोषक थरच वाहून गेल्याने पुन्हा सुपीक माती तयार होण्यास तीन वर्षे शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतील. 

नुकसान : शेतातील माती वाहून गेल्याचे परिणाम

> पोषण कमी, उत्पादन घटेल.> जलधारण क्षमता कमी होईल व पिकांना पाणी कमी मिळेल.>वाळूच्या थरामुळे पिकांची वाढ कमी होऊ शकते. 

पुढे काय ? सुपीक थर पुन्हा तयार करावा लागेल 

>कंपोस्ट, शेणखत वापर वाढवा.> मूग, हरभरा अशी मातीचा बचाव करणारी पिके घ्यावी लागतील.> मातीनुसार पीक निवड, पिकात फेरबदल करावे लागतील.

माती वाहून जाणे किंवा गाळ झालेल्या जमिनीची सुपीकता पूर्ववत आणण्यासाठी पुढील काही वर्षे शेतकऱ्यांना मृदा संवर्धानाची कामे हाती घ्यावी लागतील.डॉ. संजय भोयर, प्राध्यापक, मृदविज्ञान, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला

पुरामुळे मातीबरोबर अन्नद्रव्यांचा मोठा ऱ्हास झाला आहे. सुपीकता गेल्याने उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकताे. त्यामुळे सातत्यपूर्ण उपयांची गरज आहे.डॉ. हरिहर कौसडीकर, विभागप्रमुख, मृदविज्ञान विभाग, व. ना. म. कृ. वि., परभणी

आता उत्पादन खर्च वाढेल

मृदविज्ञान अभ्यासकांच्या मते, पुढील ३ ते ४ हंगामात कडक जमिनीत पेरणी कशी करावी अन् उत्पादन कसे घ्यावे, हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे असणार आहे. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात यंदा महापुराने मातीची धूप झाल्याने सेंद्रिय कर्ब आणि इतर पोषक घटकांचा थर नाहीसा झाला. पुढील काही वर्षे याचा गंभीर परिणाम होऊन उत्पादनात घट होऊ शकते. मृद संधारण व धूप प्रतिबंधक उपायांसाठीच्या अतिरिक्त खर्च करावा लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Floods Recede, Aid Arrives, But Farmers Face 3-Year Crisis!

Web Summary : Marathwada's farmlands eroded by floods face a 3-year recovery. Topsoil loss diminishes soil fertility, reducing crop yields. Farmers must use compost, rotate crops, and adopt soil conservation methods to restore the land.
टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी