नृसिंहवाडीत महापर्वकाल सोहळ्याची जय्यत तयारी

By Admin | Updated: June 29, 2016 16:27 IST2016-06-29T16:27:54+5:302016-06-29T16:27:54+5:30

श्री क्षेत्र नृसिंहवाडी (जि.कोल्हापूर) येथे दर बारा वर्षाने ‘गुरु’ हा ग्रह ‘कन्या’ या राशीत प्रवेश करताना कन्यागत महापर्वकाल सोहळा संपन्न होत आहे

Nirimhwadi's grand celebration of the world celebrations | नृसिंहवाडीत महापर्वकाल सोहळ्याची जय्यत तयारी

नृसिंहवाडीत महापर्वकाल सोहळ्याची जय्यत तयारी

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर - महाराष्ट्रासह अनेक राज्यात ‘श्री दत्ताची राजधानी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी (जि.कोल्हापूर) येथे दि.११(गुरुवार) व १२(शुक्रवार) ऑगस्ट २०१६ रोजी (नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या प्रमाणे) दर बारा वर्षाने ‘गुरु’ हा ग्रह ‘कन्या’ या राशीत प्रवेश करताना कन्यागत महापर्वकाल सोहळा संपन्न होत आहे. हा सोहळा पुढे वर्षभर चालणार आहे . या पर्वकाल सोहळ्या साठी सुमारे चार ते पाच लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज असून या पर्वकाल सोहळ्याची तयारी महाराष्ट्र शासन तसेच ग्रामपंचायत,सर्व ग्रामस्थ, पुजारी मंडळी, दत्तभक्त या सर्वांच्या सहकार्याने सुरवात झाली असलेची माहिती  श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान चे अध्यक्ष राहुल पुजारी व सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी दिली.

Web Title: Nirimhwadi's grand celebration of the world celebrations