Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:30 IST2025-10-04T13:27:38+5:302025-10-04T13:30:06+5:30
NCP Rohit Pawar And BJP Chandrakant Patil : रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
Gautami Patil Accident Case: पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणामुळे लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत गौतमीला उचलायचं की नाही अशी विचारणा केली. वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने रिक्षाला धडक दिली. ही कार गौतमीच्या नावावर आहे. त्यात रिक्षाचालक सामाजी मरगळे जखमी झाले. पोलिसांनी अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला नोटीसही बजावली. त्यात अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत.
रोहित पवार यांनी यावरून आता चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. "अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही!" असं म्हटलं आहे. तसेच "गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?" असा खोचक सवाल विचारला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
माननीय चंद्रकांतदादा पाटील,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 4, 2025
तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही.
गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची… pic.twitter.com/eboE6Iqixc
"माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…!"
गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
"आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल... पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.