शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना विश्वास असणारा पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:49 IST

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनादिवशी शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक; सरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवरही केलं भाष्य.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनादिवशी शरर पवारांकडून शिवसेनेचं कौतुकसरकार पाच वर्ष टिकणार, शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास.

"आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचंही कौतुक करत तो विश्वासाचा पक्ष असल्याचं म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील आठवण काढली."शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. परंतु महाराष्ट्रात शिवसेनेला अनेक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. जेव्हा जनता पक्षाचं राज्य आलं आणि काँग्रेसचा पराभव झाला त्यावेळी काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी शिवसेना हाच पक्ष पुढे आला. त्यांनी इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी विधानसभा निवडणुकांमध्ये एकही उमेदवार उभा करणार नसल्याचा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो याचा तुन्ही विचार करा. पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची कधीही चिंता केली नाही. त्यांनी इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द निवडणुका न लढवता पाळता. कोणीही काही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं कालखंडात भक्कम पणाची भूमिका घेतील ती भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तरी तसं होणार नाही," असं शरद पवार म्हणाले. लोकसभा-विधानसभेत राज्याचं प्रतिनिधीत्व करेल"हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि कामही कररेल. हे सरकार नुसतं काम करणार नाही, तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रिक काम करून सामान्य जनतेचं देशात आणि राज्या प्रतिनिधीत्वही करेल यात शंका नाही," असं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज २२ वर्षे पूर्ण केली आहेत. राजकारणात सतत काम करत राहणं गरजेचं आहे. सत्ता महत्त्वाची आहेच, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता आवश्यक आहे. हे सरकार पाच वर्ष टिकणार आणि केवळ टिकणारच नाही लोकांसाठी कामही करणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण हे प्रश्न सोडवावेच लागतील. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित झाल्या. मात्र त्या योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सत्ता एकाच ठिकाणी राहिल्यास भ्रष्ट होते"मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था असे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतीस. सत्ता अधिक हातात गेली पाहिजे. ती एकाच ठिकाणी राही तर भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हाती जाणं आवश्यक आहे. हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असं वाटलं पाहिजे," असं पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाRajesh Topeराजेश टोपेJayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र