चोपड्याच्या तरुणाचा दोरीवर चालण्याचा राष्ट्रीय विक्रम

By Admin | Updated: March 2, 2015 01:35 IST2015-03-02T01:35:59+5:302015-03-02T01:35:59+5:30

हिमालयाची भटकंती, माउंट एव्हरेस्टवर गिर्याराहण तसेच आकाशातून ३० हजार फूटांवरून पॅराशूट जंप मारण्याचा विक्रम नावावर असलेल्या चोपडा येथील

National record of running the ropes of Choparda | चोपड्याच्या तरुणाचा दोरीवर चालण्याचा राष्ट्रीय विक्रम

चोपड्याच्या तरुणाचा दोरीवर चालण्याचा राष्ट्रीय विक्रम

जळगाव : हिमालयाची भटकंती, माउंट एव्हरेस्टवर गिर्याराहण तसेच आकाशातून ३० हजार फूटांवरून पॅराशूट जंप मारण्याचा विक्रम नावावर असलेल्या चोपडा येथील विपीन बोरोले या तरुणाने रविवारी दोरीवर चालण्याचा राष्ट्रीय विक्रम केला.
विपीनने सातपुडा पर्वतातील कॅनॉलवर तब्बल ३५८ फूट अंतर दोरीवर चालून पार केले. ‘लाँगेस्ट वॉकिंग आॅन वायर रोप’ या साहसी प्रकार करणारा भारतातील पहिला तरुण ठरल्याचा दावा त्याने केला आहे.
विपीनने स्वच्छ भारत, लेक वाचवा अभियान, ग्रीन इंडिया व मेक इन इंडियाचा सामाजिक संदेश दिला आहे. वास्तविक अडव्हेंचर एरो स्पोर्टस् प्रकाराद्वारे एअर बलूनच्या माध्यमातून आकाशात १० हजार फूट उंचीवर जाण्याचे ठरविले होते. त्यासाठीची आवश्यक तयारीही केली होती,मात्र खराब हवामानामुळे ‘कॅनॉल क्रॉसिंग’ चा निर्णय घेतल्याचे विपीनने ‘लोकमत’ ला सांगितले.

Web Title: National record of running the ropes of Choparda