शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-नागभीड प्रकल्प मार्गी लागणार!

By admin | Updated: January 21, 2015 00:21 IST

रेल्वेतील विकास कामांना गती मिळावी, प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हेतूने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची

निधीची मागणी : आलोक कंसल यांनी घेतली गडकरींची भेटनागपूर : रेल्वेतील विकास कामांना गती मिळावी, प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हेतूने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी छोट्या रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी खासदार निधीतून मदत करण्याचे तसेच नागपूर-नागभीड ब्रॉडगेज प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन गडकरींनी दिल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागपूर-नागभीड या १०६ कि.मी. अंतराच्या नॅरोगेज मार्गाला गत रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळून ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर-नागभीड हा एकमेव नॅरोगेज मार्ग आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन १८८.११ कोटींचा निधी केंद्राला देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाला जवळपास ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. योजना आयोग व कॅबिनेट कमिटी इकॉनॉमिकल अफेअर्सची अद्याप या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. अलीकडेच नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचा प्रस्ताव विद्युतीकरणासह नव्याने पाठविण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कामांची दिशा निश्चित केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती कंसल यांनी नितीन गडकरींना दिली. यासोबतच नागपूर-कळमना डबलिंगबाबत चर्चा झाली. नागपूर-कळमना या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला चार वर्षापूर्वीच मान्यता मिळाली आहे. २५ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती कंसल यांनी दिली. यावर राज्य सरकार तसेच महापौरांशी बोलून प्रयत्न करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले. इतवारी, कळमना, कामठी आणि कन्हान रेल्वेस्थानकावर गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी लाकडी किंवा सिमेंटचे बेंच बसविण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. २०१०-२०११ या वर्षात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्रशिक्षण घेतलेले ३२ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संपताच बेरोजगार झाले. यावर चीफ मेकॅनिकल इंजिनिअर आणि रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले. याप्रसंगी रेल्वे ओबीसी फेडरेशनचे महासचिव मनोज समर्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)