शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, आतापर्यंत जनजागृती ७६ लाखांची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 05:17 IST

CoronaVirus News : जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता.

मुंबई : कोविड काळात १५ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत मुंबईत जनजागृती करण्यात आली. या अभियानाकरिता प्रसारभारतीसह इतर खासगी रेडिओ वाहिन्यांवरून जिंगल्स स्वरूपात संदेश देण्यात आला होता. या मोहिमेसाठी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मुंबईत आरोग्य विभाग व स्वयंसेवकांचे पथक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी व जनजागृती करीत होते. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मुंबईकरांना जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक होते. यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर, वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा स्वीकार करण्यास सामान्य जनमानसात व्यापक स्वरूपात जनजागृती होणे आवश्यक होते. यासाठी ही मोहीम १५ सप्टेंबरपासून राबवण्यात आली.

आरोग्यविषयक शिक्षण देणे हे मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्यविषयक शिक्षण देणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे जिंगल्स संदेश २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत प्रसारित करण्यासाठी एकूण ३३ लाख ५१ हजार रुपये एवढे खर्च करण्यात आले, तर १५ ते २४ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत याच खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे ४३ लाख ३३ हजार रुपये याप्रमाणे ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस