मोदी यांच्यावरील टीका सहन करणार नाही

By Admin | Updated: September 16, 2014 02:13 IST2014-09-16T02:13:59+5:302014-09-16T02:13:59+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जाहीरपणो कानपिचक्या दिल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महायुतीमधील पेचप्रसंगाची सविस्तर चर्चा झाली.

Modi will not tolerate criticism | मोदी यांच्यावरील टीका सहन करणार नाही

मोदी यांच्यावरील टीका सहन करणार नाही

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जाहीरपणो कानपिचक्या दिल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महायुतीमधील पेचप्रसंगाची सविस्तर चर्चा झाली. भाजपाला शिवसेनेसोबतची युती केवळ जागावाटपावरून तोडण्यात काडीमात्र रस नाही. मात्र शिवसेनेकडून सातत्याने नरेंद्र मोदींवर टीका झाली तर भाजपाला पर्याय उरणार नाही, अशी भावना व्यक्त झाली.
बैठकीस ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या मुखपत्रतील विखारी टिकेमुळे शिवसेनेने थेट नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याचे वातावरण दिल्लीत निर्माण झाले आहे. मोदींच्या प्रतिमेला ही बाब हानीकारक आहे. त्यामुळे मोदींवरील टीका यापुढे सहन करायची नाही. परंतु केवळ जागावाटपावरून युती तोडायची नाही, असे बैठकीत ठरले.
 
जागांची अदलबदल करा
गेल्या काही वर्षात शिवसेना सातत्याने हरलेल्या जागांची संख्या 59 आहे तर भाजपा हरलेल्या जागांची संख्या 21 आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत या जागांची फेररचना केली तर महायुतीला अधिक चांगले यश मिळू शकते. हीच भाजपाची मागणी आहे. 
- विनोद तावडे 
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
 
शिवसेनेसोबतच्या जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु असून दोन ते तीन दिवसांत निर्णय होईल. 
- ओम माथूर

 

Web Title: Modi will not tolerate criticism