शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कॅबिनेटच्या फेऱ्यात अडकली मेट्रो

By admin | Updated: July 3, 2014 01:03 IST

उपराजधानीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात येणारी मेट्रो रेल्वे कॅबिनेटच्या फेऱ्यात अडकली आहे. यामुळेच या याजनेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झालेली नाही.

आॅगस्टमध्ये भूमिपूजनाची शक्यता : भूसंपादनाची प्रक्रिया सुरू नाही
नागपूर : उपराजधानीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात येणारी मेट्रो रेल्वे कॅबिनेटच्या फेऱ्यात अडकली आहे. यामुळेच या याजनेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झालेली नाही. प्रकल्पासाठी कर्ज घेण्याचे प्रारूपही तयार झालेले नाही. मेट्रो रेल्वेला धावण्यापूर्वीच अनेक ब्रेक लागत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन करण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी असे वातावरण निर्माण करण्यात आले होते की, जणू काही हा प्रकल्प आता लवकरच साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवीत अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविले. केंद्राच्या विकास विभागाने नागपूर मेट्रो रेल्वेला तत्त्वत: मंजुरीही दिली. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच मेट्रोची चर्चाही बंद झाली. केंद्रातील नव्या सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतरही मेट्रो रेल्वेची फाईल मंजुरीसाठी कॅबिनेटपर्यंत सरकलेली नाही. वित्त विभागानेदेखील या प्रकल्पावर आपले मत दिलेले नाही. केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी शहराच्या विकासासाठी प्रयत्नरत आहेत. ते मेट्रोला गती देतील, अशी नागपूरकरांना अपेक्षा आहे.
मंजुरी मिळताच काम सुरू - दराडे
मेट्रो रेल्वे प्रकल्पावर लक्ष ठेवून असलेले नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांनी सांगितले की, केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळताच प्रकल्पाचे काम सुरू केले जाईल. कंपनी स्थापना, अधिकाऱ्यांची नियुक्ती, कर्जाचे प्रारूप आदीवर सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.