शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पॅथॉलिजिस्टबद्दल डीएमईआरचा गोंधळ

By admin | Updated: April 6, 2015 04:21 IST

राज्यात अनेक ठिकाणी हजारो पॅथॉलॉजी लॅब बोगस पॅथॉलॉजिस्ट चालवत असल्याने निदानाचा काळा बाजार होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवाशी

पूजा दामले, मुंबईराज्यात अनेक ठिकाणी हजारो पॅथॉलॉजी लॅब बोगस पॅथॉलॉजिस्ट चालवत असल्याने निदानाचा काळा बाजार होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवाशी खेळ चालल्याचे समोर आले आहे. बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करण्यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला गेला होता. पण, पॅथॉलॉजी लॅब या वैद्यकीय व्यवसायात मोडतात की पॅरावैद्यकीय व्यवसायात याचाच घोळात घोळ वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक (डीएमईआर) डॉ. प्रवीण शिनगारे घालत असल्याचे उघड झाले आहे. पॅथॉलॉजी लॅब या वैद्यकीय व्यवसायात समाविष्ट नसून त्या पॅरावैद्यकीय व्यवसायात मोडतात, असे अजब तर्कट डॉ. शिनगारे यांनी मांडले. त्यामुळे बोगस डॉक्टर म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. ज्या व्यक्तींची नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदकडे नाही, पण ते स्वत:च्या नावासमोर डॉक्टर असे लावून दवाखान्याचा बोर्ड देखील लावतात, त्यांच्यावरच बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. पॅथॉलॉजी लॅब हा वैद्यकीय व्यवसाय आहे की नाही? असा प्रश्न महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेस विचारला असता. परिषदेचे डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ‘पॅथॉलॉजी लॅब हा वैद्यकीय व्यवसायच आहे’, असे ‘लोकमत’ला सांगितले. पॅथॉलॉजी लॅबमध्ये एमडी पॅथॉलॉजिस्ट टेक्निशियनना कामासाठी ठेवतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टने पॅथॉलॉजी लॅब हा वैद्यकीय व्यवसाय आहे की नाही? असा प्रश्न डीएमईआरला विचारला होता. तेव्हा हा विषय आमच्या अख्यारित येत नाही. या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद देईल, असे सांगून त्यांनी हाथ वर केले. यानंतर असोसिएशनने परिषदेला प्रश्न विचारल्यावर त्यांनी पॅथॉलॉजी हा वैद्यकीय व्यवसायच आहे, असे लेखी स्वरूपात दिले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी ‘लोकमत’ दिली.