शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळ टाळण्यासाठी सीनिअर्सला केले मेन्टॉर

By admin | Updated: June 23, 2014 04:10 IST

हे प्रकरण एकाही विद्यार्थिनीने मला, इतर प्राध्यापक, महिला कर्मचारी किंवा त्यांच्या कोणत्याही सीनिअर्सना कधीच सांगितले नाही

स्नेहा पावसकर, ठाणेमहापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींच्या प्रदीर्घकाळ झालेल्या लैंगिक छळाला अधिष्ठाता डॉ. चोइती मैत्रा व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेला विश्वास, संवादाचा अभाव तसेच मैत्रा यांची बेपर्वाई ही मुख्य कारणे असल्याचे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मैत्रा यांच्याशी ‘लोकमत’ने केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले असून, अजब बाब म्हणजे असे प्रकार घडू नयेत यासाठी सीनिअर विद्यार्थ्यांनाच मेन्टर म्हणून नेमण्याचा अजब आदेश अधिष्ठात्यांनी काढला. हे प्रकरण एकाही विद्यार्थिनीने मला, इतर प्राध्यापक, महिला कर्मचारी किंवा त्यांच्या कोणत्याही सीनिअर्सना कधीच सांगितले नाही. ही बाब आमच्यापर्यंत आलीच नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणातून हात झटकण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ विद्यार्थिनी आणि आपल्यात पुरेसा विश्वास आणि सुसंवाद नव्हता असा होत नाही का, या प्रश्नावर त्या निरुत्तर झाल्या. मेडिकलच्या अ‍ॅडमिशनचे कोर्स पूर्ण करून आयुष्याचे सोने करण्याच्या अपेक्षेचे मोठे ओझे विद्यार्थिनींच्या मनावर असते. असे प्रकार घडले तरी ते सांगितल्याने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीवर त्याचा काही विपरित परिणाम होईल की काय, अशा भीतीची भर त्यात पडते. त्यामुळे त्यांच्यात आणि अधिष्ठाता, प्राध्यापकांत विश्वास आणि सुसंवाद असणे आवश्यक असते. परंतु इथे तो नसल्याने या विद्यार्थिनींना निनावी डरपोक स्टुडंट नावाच्या ई-मेलद्वारे महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली. परंतु महाविद्यालयात अधिष्ठाता या स्वत: महिला आहेत व महिला प्राध्यापकही सर्वाधिक आहेत. याशिवाय नर्सेस, इतर महिला कर्मचारी असताना त्यापैकी एकीच्याही लक्षात काही वर्षे राजरोस सुरू असलेला हा छळ कसा आला नाही, याचे कोणतेही उत्तर अधिष्ठाता अथवा त्यांच्या सहकारी प्राध्यापकांकडे नाही. मात्र डॉ. मैत्रा आणि त्यांचे इतर सहकारी हे मान्य करायला तयार नाहीत. प्रकरणातील आरोपी डॉ. शैलेश्वर नटराजन यांची इतर महिला कर्मचाऱ्यांशी असलेली वागणूक चांगली होती. असे असताना हा प्रकार घडलाच कसा? प्रकरण समोर आल्यावर मी स्वत: आश्चर्यचकित झाले असे त्यांनी सांगितले.