शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी मार्ड सरसावले

By admin | Updated: September 19, 2015 04:16 IST

दुष्काळाला कंटाळून राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर सरसावले आहेत. आर्थिक व मानसिक

मुंबई : दुष्काळाला कंटाळून राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर सरसावले आहेत. आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी मार्डने योजना आखल्या असून, मुख्यमंत्री दुष्काळ साहाय्यता निधीत साडेचार लाख रुपयांचे निधी दिला आहे.राज्यात वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानाचा आघात सहन न करू शकलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा प्रकारे मानसिक ताणाखालील शेतकऱ्यांना राज्यातील निवासी डॉक्टर आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. मानसशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना मराठवाड्यात जाण्याची संधी मिळावी, यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे पत्र पाठवले आहे. विदर्भातील काही ठिकाणीच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांचा मानसिक तोल ढासळण्यासाठी अनेक कारणे असतात. पण वेळीच त्यांच्या मानसिक तणावाचे निदान झाल्यास शेतकऱ्यांवर उपचार करून त्यांना ताणातून बाहेर काढता येऊ शकते. नांदेड, औरंगाबाद, लातूर, अंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर शिक्षणासाठी मानसशास्त्र विभाग नाही. यामुळे मुंबई, पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी २५ विद्यार्थी बाहेर पडतात. शिक्षण घेणाऱ्या २-३ डॉक्टरांना १५ दिवसांसाठी त्या विभागात पाठवण्याची मागणी केल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.मार्ड संघटना शेतकी कुटुंब दत्तक घेणारराज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील काही रक्कम ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. तर १० दिवसांमध्ये निवासी डॉक्टर जुने कपडे गोळा करणार असून शेतकरी कुटुंबांना देणार आहेत. डॉक्टरांकडे असलेली काही गरजेची औषधेदेखील या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. स्थानिक मार्ड संघटना त्यांच्या विभागातील एक शेतकरी कुटुंब दत्तक घेणार आहे. या कुटुंबाला सर्व मदत मार्डतर्फे केली जाणार आहे. याचबरोबर पुढचे तीन महिने स्थानिक मार्ड या कुटुंबाला ३ हजार रुपयांची मदत करणार असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.